________________
प्रसंग पंचवीसवा : ३४७
मातेन क्रोध केला त्याचा । पुन्हा मोह धरि पुत्राचा । राजासी मागु वर आमचा । पुत्र साचा व्हावयासी ॥ ८१ ॥ जावोनिया नृपापासी । माझा वर देई मजसी । माता मागावे त्वरेसी । जे मागसी ते देईन मी ॥८२॥ तेव्हा सर्व निरोपन | पुत्र वचन सत्यकरण । अंतरीक्ष सत्य जान | म्हणति जन तुम्हासी ॥ ८३ ॥
राव म्हणे जाय वो माते । पर्वत वदे ते सत्य सत्य । जही होईल प्राणांत । वर सत्यार्थ तुज दिधला " ॥ ८४ ॥ ऐसे पापी दुष्ट जन । पाप करिति हाटेकरून । यथा सर्प दुग्ध पिउन | जना विष डंसताची ॥८५॥ तेवि राजा असत्य पापी । तावत् नगरलोकसमीपि । येवोन बसले आपोआपी । ब्राह्मण पंपि' दसन्याचे ॥ ८६ ॥ नारद म्हणे पाप ठेवा । अजापुत्र न होमावा । अज्यधान्य होम करावा । सत्य सांगावा पुण्यमार्गं ॥ ८७ ॥ जैन लोक होम करिति । अन्नाहुती अग्नीस देति । पुण्यमार्ग चालविति । हिंसा न करिति धर्मवंत ॥८८॥
अज्य नाम होय घृत । अजापुत्र होम असत्य | पापे धरची फाटत । अर्थाचा अनर्थं न करावा || ८९ || पर्वत म्हणे मम शब्द खरा । अजापुत्र होम खरा । उपाध्येक परंपरा | साक्ष राजींद्रा तूच देइ ॥९०॥ ऐकोनिया तेच उत्तर । राजा वदतसे प्रत्युत्तर । पर्वताचि सत्य वैखर । दीर्घेश्वर वदतसे ॥ ९१ ॥
१. पक्षि तासडावा घ्यावा तो.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org