________________
३४२ : आराधना कथाकोष
श्लोक-पूर्वदत्तेषु या विद्या, पूर्वदत्तेषु यत्धनं । पूर्वदत्तेषु या भार्या, अग्रे धावति धावति ॥२१॥ पूर्वी दिधले शास्त्रदान । म्हनोन गुणधरा ज्ञान । सदाक्षेत्री चिंता धन । लक्ष्मी संपूर्ण स्त्रीसहित ॥२२॥ बरे स्वामि असो काही । यास कार्य सांगावे काही । स्त्रीय परीक्षा पाहे तुहि । पिष्टपक्षि त्वाहि करावे ।।२३।। ते तिघाचे हाति द्यावे । तुम्ही त्याचे कर्ण छेदावे । कोन्हाचे दृष्टि न पडावे । घेवोनि यावे आम्हापासि ॥२४॥ तिघे गेले अरण्यात । वृक्षाआड बसे पर्वत । म्हणे कोन्ही नाहि दिसत । कर्ण छेदित तयाचे ॥२५॥ येवोनिया गृहांगनी । सांगितली केली करनी । ते दोघेजन गेले वनि । विचार मनि करिताति ॥२६॥ श्लोक-अहो सर्वे प्रपश्यन्ति, चंद्रार्कग्रहतारकाः । व्यतराश्चमराधीराः पक्षिणः पशवस्तथा ॥२७॥ टीका-सर्व पाहति द्विजवृंद । सूर्य पाहे आनिक चंद्र । तारांगण ते अमरेंद्र । व्यंतरेंद्र पाहातेत की ॥२८॥ कैसे कर्ण छेदावे याचे । परपीडा मूळ पापाचे । ऐसे मुनि वदति वाचे । कर्ण याचे न छेदावे पै ॥२९॥ ऐसे म्हणोन दोघे जन । विचार करिति स्वमने । मग ते गृहासी येवोन । करिती नमन गुरूसी ॥३०॥ अहो हो श्रीगुरुदेव । कैसे याचे कर्ण छेदावे । पाहाती जीव जंतु सर्व । पाप न करवे आमुचेनी ॥३१॥ उपाध्याय म्हणे स्त्री ऐक । पाहे पुत्राचे कौतुक । निर्बुद्ध तो अविवेक । पापकारक कृतघ्न हा ॥३२॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org