________________
प्रसंग पंचवीसवा : ३४१
वसुनारद दोघे जन । शास्त्रज्ञ झाले प्रवीण । पर्वतस्य पूर्वपापेन । सरस्वती प्रसन्न नव्हेची ॥९॥ एकदा स्वपतीकारन । स्त्रिया वदे क्रोध करून । विद्या स्वपुत्राकारण । बख्यापन किं न सीक्षते ॥१०॥ क्षीरकदंब उपाध्याय । म्हणे ऐक तू मम प्रिय । पापात्मा तव पुत्र होय । हे प्रिय मम किं क्रियते ॥११॥ स्त्रियसी नसे विश्वास । प्रचीति दाखवि तिएस । बोलावि त्या स्वपुत्रास । कार्य तयास सांगतु ॥१२॥ कवडि-पैका घेवोनि जाई । बाजारि मेवा खावोन येइ । पैका गृहात घेवोन येइ । उपासि न राहिचे तुस ॥१३॥ तैसेची त्या दोघा सांगत । पैका घ्या जा बाजारात । मेवा खावोनिया त्वरित । पैका आम्हास आनोन द्या ॥१४॥ तिघहि निघाले तेथोन । फिरो लागलेति रस्त्यान । पर्वत म्हणे द्यावे फुटाने । पैका घेने तुमि आमचा ॥१५॥ फुटाने खावोन समस्त । कवड्या मागतसे त्यात । त्यानी करोनिया फजित । मूर्ख फिरत गृहा आला ॥१६॥ दोघे हलवाया दुकानी । असल मेवा पुसे वचनी । पाहु मासला चाखोनि । मग मोजोनि घेउ दोघे ॥१७॥ एक चाखोनि पाहे पेडे । दुजा खातसे रेबडे ।। हे तो नाहि वोसट गोड । तेथोनिया पुढे चालले ॥१८॥ जेथे तेथे मासला पाहति । उदर झाले असे तृप्ती । मग ते येवोनि गृहाप्रति । कवड्या देति पाणि प्याले ॥१९॥ तिघे सांगति वर्तमान । माता म्हणे पुत्र बुद्धिहीन । किंचित् पाहिजे पूर्वपुण्य । तेने ज्ञान प्राप्त पुरुषा ॥२०॥
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org