________________
३३६ । आराधना-कथाकोष
गुणव्रतानि शिक्षाव्रत । उपदेश करिति जनात । यथा वृष्टि करोनि जिमूत" । वृष्टि धान्यात होत असे ।।४२।। तथा सर्वे भव्य प्राणि । धर्मामृत ऐकोनि श्रवनि । थोर आनंद उद्भवे मनि । मेघगर्जनि मयूरे यथा ॥४३।। तदा तो मृगसेन ढीवर । धर्मोपदेश ऐकोनि सार । उभा राहिला जोडोनि कर । पुन्हा नमस्कार केला ॥४४॥ तदा तो वदे सद्गुरूसि। स्वामी मी जन्मलो नीचवंसि । सदा वधोनि जीवरासी । कुटुंबासी पोसितो ॥४५॥ पाप करितो नित्यप्रति । कैसी होईल मम गति । भवभवि दुःखसंतति । कवने रिति चुके देवा ॥४६।। क्वचिव्रत देवोनि सत्वरि । मी बुडता भवसागरि । कृपा करोनि मजकरि । काढावे बाहेरि धर्महस्ते ॥४७।। तद्वाक्य आइकोनि मुनि । वदता झाला त्यालागुनि । जीवदया व्रत घेउनि । दृढ होउनि पालिजे ॥४८॥ मग ढीवर वदे मुनीत । कोन्हि सुगम सांगावे व्रत । जेन्हे अतिचार न लागे मत । थोर पुण्य प्राप्त होय ॥४९।। तदा मुनि वदे ढीवरासि । प्रथम जाळयात येई जे मासि २ । चिसोच्छवे सोडिजे तिसि । हेचि व्रत तुजसि असो ॥५०॥ ऐसे व्रत घेवोनि सत्वरि । जावोनिया नदीतीरि । जाळ टाकता जलाभीतरि । त्यामाजि थोरि मच्छ एक आला ॥५१॥ तद् व्रताचियफले । तोचि मच्छ त्याचि जाळे । टाकिता गवसला पंचवेळे । दुजा न मिळे त्याजप्रति ॥५२॥
११. मेघ, १२. मच्छ.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org