________________
प्रसंग पाचवा : ३३५
लोक पाहोनि तुंबळ । सिघ्र येवोनि जवळ । नमोस्त केला तीन वेळ । बैसला जाळ दूर ठेउनि ॥३१॥ मुनिराज श्रावकाहिस । करिति धर्मोपदेश । पंचानुव्रत सरस । जव सावकास चित्ते' ऐकति ॥३२॥ प्रथम पालावे अहिंसाव्रत । परजीवाचा न करावा धात । वरीष्ट समस्त व्रतात । भवभवि सौख्य प्राप्त होय ॥३३॥ जो मानव आत्मासमान । परजीवाचे करिति रक्षण । तो परभवि भोगि आयु पूर्ण । राज्यनिधान पाविति ॥३४॥ जे जीवघात करोनि प्राणि । आनंद मानिति मनि । कुटंब पोसिति निसिदिनि । ते नर्कयोनि दुःख भोगिति ॥३५॥ भवभवि भोगिति आपदा । स्वप्नि न पाहे संपदा । महत् कष्ट भोगिति सदा । पातक वृंदापासुनि ॥३६॥ दानपूजा करिति जन । यम नियम ध्यान मौन । सर्व वृथा जीवदयाविन । मूळावाचून वृक्ष यथा ॥३७॥ जीवदया करोनि सहित । दृढ पालावे सत्यव्रत । कदा न वदावे वाक्य अनृत'° । कष्ट बहुत पडलिया ॥३८॥ अचौर्यव्रत पालिजे सदा । जेन्हे भवभवि भोगी संपदा । दूर पळोनि जाय आपदा । अनुक्रमे मोक्षपदा पावति ।।३९।। ब्रम्हचर्य पालिति जे नर । ते संसारसौख्य भोगिनि सार । होतील मुक्तिचे भ्रतार । निरंतर सौख्य भोगिति ॥४०॥ लोभ मोहासि मारून । करावे परीग्रहप्रमाण । जेन्हे जिवाचे होय रक्षण । पुण्यनिधान प्राप्त होय ।।४१॥
८. पुष्कळ, ९. स्थिरचित्ते, १०. लटिके.
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org