________________
प्रसंग चवथा : ३३७
मग होवोनि क्षतक्षीण । रिक्त गेला गृहालागुन । घंटाभार्याने पाहून | गृहातोनि काढून दीधला ॥५३॥ तदा अंगणामाजी १३ निजला । निद्रामाजी सर्पदंश झाला । मरोनि तवस्त्रीगभि आला । पुत्र जन्मला पुण्यफले ॥५४॥ प्राग्भवि पाळिले अहिंसाव्रत । तत्फले जाहला लक्ष्मीकांत । श्रेष्टीपतिसुती प्राप्त । कीर्ति जनात विस्तारिलि ॥५५॥ जे पूर्वि होति घंटाकामिनि । ते निदानसे मरोनि । जाहलि श्रीदत्त श्रेष्टिनंदिनि । विषयाभामिनी धनकीर्तिचि ५६ जे मच्छि येतसे जाळ । ढीवरे सोडिलि पंचवेळा । ते मरोनिया वेश्या बाळा । जाहालि निर्मला कामसेना ॥५७॥ सोडिले होते पंचवेलि । त्यास्तव येवोनि अम्राईतलि । पर्णविलि विषया बाळि । कृत तत् कालि महोपकार ॥ ५८ ॥
१४
तदा तो श्रीकीर्ति कुमर । ऐकोनि स्वभवांतर । जिनधर्म दृढ होवोनि सत्वर । कृतनमस्कार मुनिपदि ॥ ५९ ॥ म्हने अहो सद्गुरु स्वामि । अनंत काल संसार गहनि । चतुराशीतिलक्षयोनि । चतुःखानि दुख भोगिले ||६० ||
I
देवा या संसारसागरात । उम्मज्जन निमज्जन कृत । तेन्हे फार जालो दुःखित | आता तारी मत सीघ्र स्वामि ॥ ६१॥
दिक्षा द्यावि मजप्रति । जेन्हे कर्माचि होय निवृत्ति ।
सौख्य भोगोनि नृदेवगति । शाश्वत गति देइ त्वरे ॥६२॥
तद् विज्ञप्ति ऐकोनि मुनि । वदे श्रीकीर्तिलागुनि । दिक्षा घेई पुण्यपावनि । आली यत्क्षणि त्वत् काललब्धि ॥६३॥
१३. अंगणात, १४. कन्या, १५. वनि.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org