________________
प्रसंग दुसरा : ३२१
तेथे गोपाल मिळून । चारीत होते गोधन । त्याहिने पाहिला नंदन । करिति रुदन बुभुक्षया ॥६६॥ तदा करुणा आनोनि अंतरि । वदताति परस्परि ।
ऐसि कोन पापिनि असे नारि । जिन्हे रत्न वनांतरि टाकिले ॥६७॥
तदा एक धेनु येउनि । उभी ठाकली बाल रक्षुणि ॥ क्षीर त्रविले तदवदनि । मोह धरोनि तयावरि ॥ ६८ ॥
तदा श्रीदत्त भगिनिवर" । गोस्थानि" पावला सत्वर । इंद्रदत्त नामे वणिग्वर । येत होता वेव्हार करावया ॥ ६९ ॥ तदा बालक वर्त्तमान । गोपालमुखे कृत श्रवन तत्क्षणि पाहिला येउन । जैसा भान गगनांतरि ॥७०॥ त्वरे घेवोनि तयासि । सिघ्र गेला स्वगृहासि । सुप्तस्त्रीयेचे गुह्यद्वारासी । बालकासि ठेविले ॥ ७१ ॥ मग वदे हे राधिके प्रिये । ऊठ ऊठ लवलाहे" । पश्य पश्य पुढे काय आहे । प्रसवली काय गूढगर्भनि ॥ ७२ ॥ तदा भ्रताराप्रती बोले । पूर्विच कर्माने असे गांजिले । आता मम हृदइ वहिले " । विनोदभाले काय मारिता || ७३ ॥ तदा श्रेष्टि म्हने गे भामिनि । पाहिजे नेत्र उद्घाटुनि । सत्यासत्य येइल कळोनि । दुःखित होउनि काय वदसि ॥ ७४ ॥ ऐकोनि " धवाचि वैखरि" । उठोनि बस लि सत्वरि । बालक पाहिला एकेसरि । जानुवाभीतरि अतिसुंदर ॥७५॥ तदार्भकाचे" पुण्यप्रभाव । करोनि जन्म महोत्सव | स्तनंधय ठेविले नाव । नर नारि मोह फार करिति ॥ ७६ ॥
१०. क्षुधातुर, ११. श्रीदत्त, श्रेष्टीचे बहेनिचा नवरा, १२. गोठानावर, १३. लवकर, १४. फिरून. १४. भ्रताराचि, १५. वचन.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org