________________
३२२ : आराधना कथाकोष
अहो पुण्यवान् जीवाप्रति । दुष्ट जन जव जव गांजिति । तव तव सौख्यात पाविति । दुर्जन दुर्गति दुःखभोगी ।।७७॥ तदा बालकाचे वर्तमान । श्रीदत्त समजला जान । सत्वरि आला धाउन । मीसे करोन भेटिचे ॥७८॥ मग राहोनि दोन दिवस । वदे भगिनि भ्रतारास । मम गृहि एक मास । मम भगिनीस पाठवावे ||७९|| थोर कापटय वसे मनि । बोलोनिया अमृतवचनि । बालकासहित भगिनि । आला घेवोनि स्वमंदिरि ॥८॥ मग कितियक दिवसि । पाचारोनि मातंगासी । द्रव्यलोभ दावोनि त्यासि । बाल वधाव्यासि धाडिला ॥८१॥ बालक घेवोनि सत्वरि । जावोनिया वनांतरि । अर्भक ठेवोनि नदीतीरि । तद्रूप नेत्रि न्याहाळिति ॥८२॥ पाहताचि तद्रूपसंपत्ति । थोर दया उद्भवलि चित्ति । बालक ठेवोनि एकांति । स्वगृहाप्रति आला त्वरे ॥८३॥ कुमराचे पुण्य करोनि । धेनू येवोनि तत्क्षणि । क्षीर स्रविति तद्वदनि । यथा जननि बालकासी ॥८४॥ ऐसे पाहोनि गौरक्षी । घेवोनि स्वस्व ७ गोधनासि । संध्याकाळि निजग्रामासि । जावोनि मातृपित्यासि कथिले ॥८५।। सर्व गौलियाचा नाथ । गोविंद नामे असे सात्विक' । धनकनाचा नसे थाक । परंतु निपुत्रिक असति ।।८६।। समस्त जावोनिया गवळि । मात जानविलि सकळि । तदा त्वरे जावोनि त्या स्थळि ।उचलोनि' करकमलि घेतला ।८७।
१६. बालकाचे, १७. ढोरकि, १८. भला, १९. (बालक)
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org