________________
राजश्रेष्टि नामे श्रीदत्त । समीपवर्ति असे राहात | तेन्हे ऐकिले मात । जे मुनिनाथ कथिलि ||४३||
प्रसंग दुसरा : ३१९
I
म्हने मुनीश्वराचे वाक्य । कदा न होय लटिके । जरी सीतल निघे पावके । तरि मुनिभाख्य नव्हे दुजे ॥ ४४ ॥ ज्या कालि हा वृद्धि पावल । तदा मम पद घेइल | मुनिवाक्य निश्चय होइल । महत्त्व जाइल सर्व माझे ॥४५॥ जरी उद्भवे विशांकुर । चतुरे छेदावे लवकर । वृद्धि बलाढ्य झाल्यावर । प्राण सत्वर घेत असे ॥ ४६ ॥ बालक होताचि उत्पन्न । यासी टाकावे मारून |
तदा सौख्य होइल मजकारण | ऐसे चिंतन करू लागला ||४७||
प्राणी चितवन करी सरसे । परीते होय भलतिसे । सुभासुभ जे देवि असे । निश्चय तं सेचि होइल ||४८ || उक्त दुहा - मन चिंत्य मानवा ससा चिंते रान । मासा चिते खोलपानि, कर्त्तार करे सो आन ॥ ४९ ॥ तदा धनश्री पूर्णमासी | शुभनक्षत्रे शुभदिवसि । सुखे प्रसविलिपुत्रासी । जैसी भानुसि पूर्वदिशा ॥ ५०॥ तेजरूपे करोनि आगळा । केवळ पुण्याचा पुतळा । ऐसा श्रेष्टने पाहिला । अग्निज्वाला यथा वनि ॥ ५१ ॥ द्रव्य देवानिया दाईत । करिता झाला वसीभूत | म्हने कौने उपाय त्वरित । बालकात वधावे त्वया ॥ ५२ ॥ प्रसूतवेदनाकरोन । बालकमूच्छींग होउन । राहिला ऐसे एकक्षण असा धाविन पाहिला ॥५३॥ द्रव्यलोभ धरोनि वराक | धनश्रीत वदे बाइ आइक । जन्मताचि हे बालक । असे मृत्यक प्रसविले ॥५४॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org