________________
३१४ | आराधना - कथाकोष
म्हने स्वामि सोडोनि मौन । मजसि वदावे मिष्टवचन । गृहांतरि चालावे लवकुन । करावे भोजनपान लौकरि ||९६ || ऐसे वदोनि धरला हात । स्वकर घालोनि गल्पात । उठवित असे तयात । तदा प्राणमुक्त पति पाहिला ॥९७॥ तदा रुदन करिति थोर । निजकरे पीटिति भालउर" । तद्गुण आठवोनि फार । धरणिववर आंग टाकिति ॥ ९८ ॥ अहो अहो मम स्वामि । कोठे गेलासि मज टाकुनि । एकली मी तुजवाचुनि | जैसी हरणी वनामानि ॥ ९९ ॥ स्त्रिया स्वभाव असति असे जिवंत धवासि गांजीतसे । मरण पावल्या दिवसे । शोक करीतसे बहुत ॥ १०० ॥ ज्याचे होनहार उत्तम । तैसीच बुद्धि होय निर्मान | साहित्य मिळे त्याप्रमाण । शुभाशुभ येउन मिलतसे ॥ १०१ ॥ तदा वदे ढीवर कामिनि । जे व्रत असे धन्यालागुनि । दिधले असे जे सद्गुरूस्वामि । तद्व्रत मजलागुनि असो ॥ १०२ ॥ भवांतरि हाचि भर्ता । मज होइजे सौख्यकर्ता ।
|
मी होइजे याचि कांता । असो उभयता फार प्रीति ॥ १०३ ॥ ऐसे करोनि निदान । स्वभ्रतारासहित जान । महत्साहासे करोन | अग्निकाष्ठ घेउन मृत्यु पावलि ॥ १०४ ॥ अहो धीवर आनि धीवरि । मृत्यु पावले यापरि ।
|
जन्म घेतील ज्याचे घरि । पुडिल्याधिकारि श्रवण होइल ॥ १०५ ॥
इति कथाकोशे रत्न कीर्त्याचार्यविरचिते मृगसेन धीवर अहिंसावत रक्षण माहात्म्य कथा वर्णन प्रसंग पहिला ||
२२. कपाळ.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org