________________
प्रसंग दुसरा
सावध होवोनि सभाजन । अग्रकथेची मांडन । कथितो मी पुण्यपावन । करावे श्रवण एकचित्ते ॥१॥ सार धर्म देशांतरि । असे विशालाख्या नगरि । तेथे विश्वंभर नृप राज्य करि । तत् प्रताप वैयावरी असे ॥२॥ विश्वगुणा नामे करोनि । त्या भूपतीचि असे रानि । रूपसौभाग्याचि खानि । क्षमा धरणिसम असे ॥३॥ त्या नगरामाजी सबल । श्रेष्टी असे श्रीगुणपाल । जनलोक मानिति सकल । जिनधर्म निर्मल पालीतसे ॥४॥ धनश्री नामे असे भार्या । तत्पर असे धर्मकार्या । रूपगुणे करोनिया । राम जायासारिखि' ॥५॥ त्या दोघाहि प्रति । कन्या असे बंधूमति । चंद्रवदनि जगति । यौवन संपत्ति असे पावलि ॥६॥ धनश्री आनि गुणपाल सार । भोग भोगिता निरंतर । तत् गर्मी धरिला अवतार । धीवर मृगसेनाने ॥७॥ गर्भ वाढिति दिवसमासी । तव तव मानिति महाखुसि । न्हवनपूजा दिवसादिवसि । याचकजनासि दान देति ॥८॥
१. सीता.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org