________________
प्रसंग चोविसावा : ३०९ तदा त्या वनामाजि प्रबल । श्रवणि ऐकिला कोलाहल । म्हने येथे का होतसे खेळ । जाउनि जवळ पाहू बरे ॥४१॥ तदा तेथे जावोनि त्वरित । नृपश्रावक जनसहित । मध्यस्थ पाहिले मुनिनाथ । धर्मामृत वर्षाव करिति ॥४२॥ यती श्रावकाचार सकल । मुनींद्र वदति ज्ञानबल । पापपुण्याचिय फल । मन निश्चल जन ऐकति ।।४३॥ तदा तो पापिष्ट धीवर । जाल ठेवोनिया दूर । तारशब्दे" करोनि थोर । मुनिपदिसार नमोऽस्तु केला ॥४४।। तदा त्या धीवराकारण । आसन्नभव्य जीव जानुन । धर्मवृद्धि तयाकारण । बृहत्स्वरे करोनि दिधलि ॥४५।। तदा तो वदे जी गुरूस्वामि । मी थोर असे पापकर्म । दुक्खडोहि बुडतसे मी । कृपा करोनि मज उद्धरि ॥४६।। तदा मुनि वदे रे मच्छबंध" । अहिंसाव्रत महाशुद्ध । जरी पालिसी मनशुद्ध । तत् फले उर्ध्वगति" पावसि ।।४७।। ढीवर म्हने " जी मुनीराय । अहिंसाव्रत म्हनिजे काय । कैसे परि आचरावे । ते वदावे मजप्रति" ॥४८।। मुनि वदे रे पंचस्थावर । त्रस मेलउनि षट्प्रकार । रक्षण करावे निरंतर । दया थोर आनुनि हृदि ॥४९॥ ढीवर म्हने जी गुरूस्वामि । नीच कुळि जन्मलो मी । नित्य जलचर जीव वधोनि । पुत्र-कामिनिलागि पोसितो ।।५०॥ स्वामि सुगम सांगावे व्रत । जेन्हे जिवाचे होय हित । कुटुंब पोसिता दिनरात । सदोदित सौख्य होय ।।५१।।
१३. लांब शब्द, १४. टीवरा, १५. स्वर्गगति.
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org