________________
३०८ : आराधना-कथाकोष नृपापुढे भेटी ठेउनि । कृत नमन जोडोनि पाणि । वदता झाला हर्षवदनि । मद् विज्ञप्ति कणि ऐकिजे ॥३०॥ तव पुण्य उदयागत । राया मनोहर वनात । महातपस्वी ज्ञानवंत । आगमन केले मुनिराये ॥३१॥ अतिशय ज्याचे असे थोर । मिळोनिया सुरनर । वदनि वदति जयजयकार । गजर वाद्याचा होत असे ॥३२॥ मिळोनिया श्रावकजन । धर्मोपदेश करिति श्रवण । ऐसे अतिशय पाहून । आलो धाऊन सांगाव्या तुज ॥३३॥ तद्वाक्य ऐकोनि भूपति । थोर आनंद धरोनि चित्ति । मुनि वंदना करायाप्रति । उद्भवलि प्रीति महदंतरि ॥३४॥ सकल परिवार सहित । त्वरे जावोनि वनात । त्रिकरणे वंदिता मुनिनाथ । जन समस्त मिळोनिया ॥३५॥ बैसोनिया योग्य स्थानि । धर्मोपदेश ऐकति श्रवणि । जेन्हे पातकाचि होय हानि । सौख्यखानि असे भवभवि ॥३६॥ त्याचि ग्रामामाजि सार । मगसेन नामे असे धीवर । जीव वधोनि जलचर । सदैव उदर भरीतसे ॥३७॥ घंटा नामे असे तन्नारि । क्रोधे सर्पिणी स्वरे खरी" । बहु भक्षि स्वरूपे शूकरी । शयने बांदरिसम असे ॥३८॥ पूर्वपापे करोनि । प्राप्त होय ऐसी भामिनि । भांडन करिति निसिदिनि । तृणासमान मानिति धवा ॥३९॥ तदा तो ढीवर मृगसेन । स्कंधपृष्ठे जाल रोपुन । क्षिप्रा नदीलागुण । वेगे करोन जात होता ॥४०॥
१०. करकमल, ११. गर्दभी, १२. भ्रतार.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org