________________
३१० : आराधना कथाकोष तदा यशोधर ऋषी । चितवन करि स्वमानसि । काय व्रत द्यावे यासि । हिंसा दिवानिसि करितसे ।।५२।। आता याचा आयुष्य जान । उरला असे एक दिन । निश्चय करावे व्रतबंधन । जेन्हे होय कारण सौख्याचे ॥५३।। जगि जे असति भव्य प्राणि । पाप करिति निसिदिनि । परी अंतःकालि व्रतेदानि । पुण्यसदनि जन्म घेति ॥५४॥ तदा यशोधर यति । वदता झाला त्याप्रति । बारे मद्वाक्य धरावे चित्ति । जेन्हे स्वर्गसंपत्ति मिळे ॥५५॥ प्रथमारंभि जालांतरि । मच्छ जो येईल लघुथोरि । तो सोडिजे जलाभीतरि । दया अंतरि आनोनिया ॥५६॥ हेचि तवांगि असो व्रत । पाळावे मृदु करोनि चित्त । स्वया न तजावे प्राणांत । महोपसर्ग तूत होय जरी ॥५७॥ प्रथम सोडिसि ज्याकारण । जरी तो येइल दुसऱ्यान। शीघ्र देइजे टाकून । चित्ति मानून व्रत भंग भय ॥५८॥ जे जन घेवोनि व्रतासि । संकटि तजति तयासि । ते भोगिति दुःखराशि । दुर्गतीसि जावोनिया ॥५९॥ अंगिकारि जो जैनवत । पालिति दृढ करोनि चित्त । जरी संकटि पावति अंत । तरी जीवाचे हित होतसे ॥६०॥ ऐसे जानोनि भव्यजन । जैनव्रत चितामणिरत्न । रक्षण करावे करोनि यत्न । महत्सौख्य सर्वत्र प्राप्त होय ॥६१॥ तदा मुनि वदे रे धीवर । महामंत्र पंचनमस्कार । जपत असावे वारंवार । यदंगीकार करी त्वरे ॥६२॥ जरी असता सुखि दुःखी । हा मंत्र जपावा मुखि । अंतरी दृढ धरोनि राखि । जेन्हे होसिल सुखि भवभवि ॥६३॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org