________________
३०२ : आराधना कथाकोष
आधीच दारुनाग्नी स्वभाव । त्या माजि सुटला वायव । सर्वांगि पावोनि उत्सव । नाना वस्तु सर्व जालिति ।।८९।। उक्तं कथाकोशे : स्त्रीणां स्वभावतो माया, किंपुनर्लोभकारणे । प्रज्वलन्नपि दुर्वह्निः, किं वाते वाति दारुणे ॥९०॥ तत् क्षणि नृपकिंकराहिन । मातंग काढिला गृहातून । त्वरे चालिले घेऊन । श्रेष्टिनंदन द्यावया सूलि ॥९१॥ तदा वदे तो सुभटाहित । जरी कराल मम प्राणांत । तरी मी न करि जीवघात । असे चित्तात हाचि निश्चय ॥९२॥ तदा धरोनिया त्यासि । घेवोनि गेले नृपापासि । स्वामी हा न वधे श्रेष्टिपुत्रासि । ऐसे नृपासि वदु लागले ॥९३॥ तदा नृप वदे त्याकारण । रे मूर्खा श्रेष्टीसुताकारण । का न करिसि शूलारोपण । स्वर्णाभूषण मिळता तुज ॥१४॥ देवा चतुर्दशीचे दिवसि । न करावे जीवघातासि । ऐसे व्रत असे मजसि । सद्गुरूपासि असे घेतले ॥१५॥ तदा होवोनि क्रोधरूप । तयालागि वदे भूप । मद्वाक्य नाइकिसि अद्याप । आले त्वत् पाप उदयागत ॥९६।। देवा हे व्रतनिधान । दुःप्राप्य पावले जान । सुवर्णलोभे करोन । व्रतालागुन न सोडि मी ॥९७॥ तद्वाक्य ऐकोनि नरेश्वर । हृदि क्रोध प्रजलला थोर । कोट्टपालादि किंकर । बाहोनि सत्वर वदे त्याप्रति ॥९८|| हा मातंग आनि श्रेष्टिसुत । दोघासि नेवोनि त्वरित । कृताज्ञाभंगदोशयुक्त । शिशुमार डोहात टाकिजे ॥१९॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org