________________
प्रसंग तेविसावा : ३०१
ऐसे विचारोनि चित्ति । त्वरे उठोनि वदे स्त्रीप्रति । तुज सांगितो यथायुक्ति । नृपभृत्याप्रति वदिजे त्वया ॥७७॥ या क्षणि येवोनि किंकर । हाका मारितील थोर । कोठे गेला गे तब भ्रतार । वद लौकर आम्हाप्रति ||७८|| तदा निर्भय होउन । परग्रामा गेला म्हनोन |
त्वा वदावे त्याहाकारण । मम व्रतरक्षण व्हाव्याप्रति ॥ ७९ ॥ तेचि जानावि उत्तमस्त्रिया । जे तत्पर असे स्वामिकार्या । नित्याज्ञांकित राहोनिया । भ्रतारपाया सेविति ॥ ८० ॥ ऐसे दोनि सत्वरि । जावोनि लपला गृहांतरि । कंपित होवोनि शरीरि । चिंतन करि व्रतरक्षणा ॥८१॥
नृपदूत येवोनि तत्क्षणि । मातंग मातंग म्हणोनि । हाका मारिति क्रोधवचनि । तदा मातंगिनि वदे त्वरा ||८२ ॥ मातंग वदे त्याहासि । साहेबा कालचे दिवसि । गेला असे परग्रामासि एक्या दो दिवसि येइल ॥ ८३ ॥ ऐकोनि मातंगिचे वचन । दूत वदति तिजकारण | पापीष्ट असे दैवहीन । गेला म्हणोन परग्रामि ॥ ८४ ॥
धर्मक श्रेष्टिचा पूत । शूलि देवोनि तयात । स्वर्णाभूषण बहुत । तयासि प्राप्त झाले असते ||८५ || जैसे आइकोनि मातंग | आनंद पावलि सर्वांगि । परग्रामा गेला जी अभागी । दरिद्र्यालागि केचि धनप्राप्ति ॥ ८६ ॥ परग्रामा गेला म्हनोन । वदने वदति वचन ।
करांगुलि संज्ञा करोन । भ्रताराकारण दाखविले ॥८७॥ आधीच कपटी असति नारी । स्वर्णलोभ उद्भवला त्यावरि । कैसे मन राहिल स्थिरि । मातंग सत्वरि दाखविला ||८८ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org