________________
३०० : आराधना - कथाकोष
तदा मुनींद्र वदे त्यासि । मासामध्य युग्म चतुर्दसि । थोर पर्वनि तिथि दिवसि । जीवघातासि न कारिजे ॥ ६५॥
मुनिवाक्य ऐकोनि त्वरा । हृदयी आनंद भरला सारा । म्हणे हा नियम असे बरा । देइजे त्वरा स्वामिराया ॥ ६६ ॥ तद्व्रत तयालागि देउन । म्हने हे सार अनर्घ्यरत्न ।
त्वया निसिदिन करावे यत्न । विस्मृति करून न गमाविजे || ६७ || जरी पडे प्राणसंकट । तरी हृदि धरि बळकट | येवोनि पडल्या नाना कष्ट । तरी व्रतभ्रष्ट होउ नको ॥ ६८ ॥ जे जे व्रतभ्रष्ट होति । ते ते दुर्गतिमा जि जाति । नानाप्रकारे दुःख भोगिति । तयाचि गणति कोण करि ॥ ६९॥ मुनीने व्रत दिधले सार । ते मातंगे केले अंगीकार । सर्व व्रतामाजी थोर । यथा गजवर गजामाजी ||७०॥ तदा तद्व्रत घेउन । मुनिपदि करोनि नमन । निज गृहालागि जाउन । उदरपोषण करीतसे ॥७१॥ यत्ने करोनि व्रत पालिति । तद्द्विसाचि नव्हे विस्मृति । दरिद्रयासि यथा धनप्राप्ति । स्मरण करिति निशिदिन ॥७२॥ ऐका हो सर्व सभामंडळी । कथा हे गेलि पूर्वस्थलि । तस्कर नेला द्यावया शूलि । पातले तद्वेळि नृपकिंकर ॥७३॥ अहो तो मातंग तत्क्षणि । बैसला होता निजांगणि । नृपभृत्य पाहिले लोचनि । भयभीत निजमनि थोर झाला ||७४ | म्हणे धर्मक श्रेष्टिनंदन । करावया शूलारोपन ।
येति मम न्यावया लागुन । बले घेउन मज जातील ॥७५॥ आज चतुर्दसि पर्वनि । नियम असे मजलागुनि । जीवघात न करावे म्हणोनि । सद्गुरूवचन अंगिकारिले ॥७६॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org