________________
प्रसंग तेविसावा : ३०३
तदा नृपाज्ञा करोनि । नग्रजन फार मिळोनि ।
1
दोघा हिसि चालले घेउनि । मातंग त्या क्षणि विचारि हृदि ॥ १००॥ जरी चुकू ह्या विघ्नापासून । तरीच घेउ अन्नपान । न तरी सकल संन्यासग्रहण | मजकारण शुद्ध असो ॥ १०१ ॥ तदा तराळे" करोनि युक्ति । वस्वामाजि बांधोनि लोथि । नेवोनि शिशुमारद्रहांति । दोघाहिप्रति टाकिले ॥१०२॥ टाकिताचि श्रेष्टिकुमर । भक्षण केला मच्छमगर । जगामाजी जे पापीष्ट । नर तयाचा संहार होतसे त्वरे ॥ १०३॥ दृढ पाहोनि मातंग मन । जलदेवता शीघ्र येउन । सिंहासन बैसऊन । अभिसिंचन" करू लागल्या ॥ १०४ ॥ वस्त्राभूषणे करोनिया । पूजिति तयाचि काया । मुखी जयजय वदोनिया । पुष्पवृष्टि तयावरि टाकिति ॥ १०५ ॥ तत् प्रभाव पाहुनि जन । नृपासि केले निवेदन । सत्वर आला धाऊन । करिति पूजन जनसहित ॥ १०६ ॥ व्रतमाहात्म्य जानोनि ऐसे । मातंग पूजनीक झाला असे । भव्यजन पालिजे सर्वसे । पातक नासे भवभवीचे ॥ १०७॥ व्रतमाहात्म्यकरोनि । मातंग पावला पूजा जनि । अंतरि ऐसे जानोनि । न करावे कोन्हि जातिगर्व ॥ १०८ ॥ सर्वहि व्रतामाजि सार । अहिंसा व्रत असे थोर । जे पालिति भविक नर । ते मुक्तिचे भ्रतार शीघ्र होति ॥ १०९ ॥ काव्य उक्तं -मातंगो यमपालको गुणरतैर्देवादिभिः पूजतो । नानावस्त्र सुवर्णरत्नविकसन्पुष्पोत्करैः सादरं ।
१५. कोतवाल, १६. अभिषेक.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org