________________
प्रसंग तेविसावा : २९७
शूलि फासी देन्हार । नियोगि असे पांढेवार । त्यासि आनायालागि किंकर । धाडिले सत्वर कोतवाले ॥३०॥ अहो सकल सभाजन । पूर्वी जाहल जे कारण ।
ते वदतो तुम्हा कारण । चित्त स्थिर करोन आइका ||३१|| एके समयी उद्यानवनि । तपी व्रती ध्यानी मौनी । सर्वोषधि नामे करोनि । महामुनि विहार केले ||३२|| विज्ञानधारि कृपासागर । मेरगिरि समान धीर । चारित्रचूडामणि थोर । प्रताप दिनकरसमान असे ||३३|| जे त्रितापे" करोनि पीडित । भव्य जीव असति अत्यंत । वर्षाव करोनि धर्मामृत । संसृतिरहित शीघ्र करिति ॥ ३४ ॥ भव्यजनाचे त्रितापनाश । करोनि धाडिति सिद्धिग्रामास । म्हनोनि नाम सर्वोषधीश | सार्थक मुनीस जाहाले ||३५|| यतींद्र तपाचिय बल । षट्ऋतूचे पुष्पफल । उद्भविले एकेचि वेळ । शुष्क वापिका जल भरिया ||३६|| सर्प नकुल गाइ व्याघ्र । मृगस्वान मूषकमार्जार" । क्रूरजीव सर्वथा त्यजोनि वैर । होवोनि एकत्र क्रीडति ॥ ३७॥ तदाश्चर्य पाहोनि नयनि । वनपाल पुष्पफल घेवोनि । शीघ्र जावोनि राजभुवनि । जोडोनि पाणि" नृप जुहारिला ॥ ३८॥
पुढे भेटी ठेवोनि सत्वरि । वदता झाला भिष्ट वैखरि" । देवा त्वत् पुण्यकरोनि थोर । मुनींद्र वनांतरि पातले ॥३९॥
ऐकोनि तयाचे वचन । थोरानंदले नृपाचे मन । परोक्ष वंदना करोन | आनंदभेरी जेन देवविलिं ॥ ४० ॥
११. जन्म, जरा, मृत्यु, १२. उंदिर, १३. हात, १४. वाणी.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org