________________
२९६ : आराधना-कथाकोष
तदा संध्यासमयी ऐसे । सेवकाहित भूपति पुसे । कारे अद्यापि मेंढा न दिसे । रक्षण कैसे करितसा ॥१९॥ ग्रामांतरि नगराबाहिर । मेंढा पाहोनि आना सत्वर । तो असे मत् प्राणाबरोबर । युद्ध कराया थोर बलिष्ट असे ॥२०॥ ऐकोनि नपाचि वैखरि । सेवक धाविले सत्वरि । ग्रामांतरि आनि बाहिरि । पाहता रात्रि थोर जालि ॥२१॥ ग्रामामाजी फिरता जान । रात्र प्रहर जाहालि दोन । तदा क्षतक्षीण होउन । स्थान स्थानि जाउन बैसले ॥२२॥ तदा तो वनाचा वनमाळी । पाहिलेसे जे संध्याकाळी । ते सर्वे निज-भार्या-जवळि । वेळोवेळि वदतसे ॥२३॥ तदा एक नृपकिंकर । तद्वाक्य ऐकोनि सत्वर । जावोनि विनविला नृपवर । तत् कृत्य जाहिर सर्व केले !॥२४॥ भूप ऐकानि सेवकोक्ति । क्रोधे प्रजलला थोर चित्ति । भत्याहिसि म्हने तो पापमूर्ति । शीघ्रगति धरोनि आना ॥२५॥ नृपाज्ञा करोनि भृत्यजन । जावोनि धरिला श्रेष्ठिनंदन । बांधोनिया दृढबंधन । आले घेउन भूपसन्निध ।।२६।। श्रेष्ठिपुत्र पाहिला पापरूप । हृदयी प्रजलला थोर कोप । तदा तराळासि वदे भूप । मद्वाक्यलोप कृत दुर्जने ॥२७॥ हा धर्मदत्त श्रेष्टीचा सुत । सप्तव्यसनि पापयुक्त । शूलारोपन करावे यात । किंचिदुशीरात न लाविजे ॥२८॥ तदा यमदंड कोट्टपाल । तयाचे स्कंधी देवोनि शूल गोभय-मृत्तिका" मारिति बाल । घेवोनि तत् काल तयासि गेले॥२९॥
८. वाणी, ९. शेण, १०. माती.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org