________________
प्रसंग तेविसावा : २९५ तद्वनि एक किरात। दुव्होनि पाहिले मुनीत । बाणे वेधिले त्वरित । अपशकुनात मानोनिया ॥८॥ यतींद्र तपाचिय बळे । शुभ मृत्यु साधो नि तवेळे । अच्युतस्वगि पुण्यप्रबळे । जाहाले देव महद्धिक ॥९॥ मुनिहत्या करोनि पातकि । कुमरने मरोनि लोकि । जावोनिया तृतीय नरकी । महद्दुःख एकाकी भोगिति ॥१०॥ पाहोनिया मुनिवर वध । वनदेवे कृत महत् क्रोध । देसासि पीडा मांडिलि वृद्ध' । न दिसे अबाध क्वचित् प्राणी ॥११॥ तत् रोगाची व्हावया शांति । भूप विचारि निजचित्ति । धर्मोषधे विना निवृत्ति । उपाय बहुति होयेचि ना ॥१२॥ निजांतरि जानोनि ऐसे । अष्टाह्निका कार्तिक मासे । जीववध न करावे सर्वसे । जनी ऐसे सुचविले ॥१३॥ अहो तदा त्या भूपतीन । निज प्रजाचे हिताकारण । सर्वत्र घोषणा देऊन । दान-पूजा-नुष्ठान करिति ॥१४॥ तदा एक्या श्रेष्टीचा सुत । सप्तव्यसनी पापयुक्त । मद्यमांस नित्य भक्षित । भोगाव्यात दुःख राशि ॥१५॥ तद्ग्रामाबाहिर एकांत । नृप मेंढक होता चरीत । तयाचा करोनिया घात । संस्कारोनि गुप्त भक्षिला ॥१६॥ तदस्थि' एक्या गारे भीतरि । आच्छादोनि गेला सत्वरि । पापिष्टवृत्ति असे यापरि । कवनाचे न धरि भय चित्ति ॥१७॥ संध्यासमयी तद्वनी । तत् कृत्य वनपाल पाहोनि । महदाश्चर्य मानुनि मनि । स्वगृहालागोनि आला त्वरे ॥१०॥
४. भिल्लाने, ५. मोठी. ६. हाड, ७. लपविले,
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org