________________
प्रसंग बाविसावा : २८७
मग गुप्तरूपे धाविन्नले । शीघ्र तयासि धरले । 1 बांधोनि राजद्वारि नेले । त्वरे योजिले शुक्लकाष्टी ॥९२॥ सप्तव्यसनी होता तस्कर । तयाने पाप जोडिले थोर । तेने घडला हा प्रकार । महाघोर दुक्खराशि || ९३ || आता अपर जाइका मात । या उज्जयनि नगरात | थोर असे लक्ष्मीकांत । धनदत्त राजश्रेष्ठी ॥९४॥ तो जिनमार्ग असे निपुण । नित्य जिनमंदिरि जाउन । करित असे न्हवन पूजन । चारि दान देत असे ||९५|| गुणवती प्रियासहीत युक्ति । तपव्रत नेम आचरिति । षट्कायजीव रक्षिति । कृपा चित्ति निरंतर ॥९६॥ ज्ञान विज्ञाने महाचतुर । जयाचे चित्त असे उदार । याचकजना प्रति प्रचुर । वसनादि सार- द्रव्य देति ॥ ९७ ॥ नृपाची थोर असे प्रीति । देशावरि व्यापिलि कीर्ति । सप्तक्षेति द्रव्य खर्चिति । भांडार भरिति पुण्याचे ॥ ९८ ॥ ग्रामाबाहेरि नंदनवन । नृपाचे होते गहन । वापी कूप शोभायमान । शीतल जीवन मिष्ट फार ॥९९॥ महा रमणीक एके दिनि । श्रेष्ठिने पाहोनि लोचनि । विचारिले अंतःकरणि । करावे या स्थानि जिनमंदिर ॥१००॥ तदा श्रेष्ठीने मनोहर शिखरबद्ध जिनमंदिर | शीघ्र करोनि तयार । माजी सुंदर बिंब स्थापिले ॥ १०१ ॥ मग मिळवोनि चतु:संघ | द्रव्य खर्चिति मनरंग । कृत प्रतिष्टा जिनोक्तमार्ग | आंगोपांग जिनमूर्ति ॥ १०२ ॥ चतुः संवाचा बहुमान । करोनि दिधले चारि दान | वस्त्रभूषणादि देऊन । याचकादि मन संतोषविले ॥१०३॥
।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org