________________
२८६ । आराधना-कथाकोष
त्या गणिकेसी थोर प्रीति । तयात तस्कराचि होति । क्रीडा करिति दिवाराति । उत्कृष्ट देति द्रव्यराशि ॥८०॥ तदा वदे गे हे हे प्रिय । शरीरि दुक्ख प्रवर्तले काय । ते मजसि शीघ्र वदावे । करीन उपाय रोगशांति ॥८१॥ तदा गणिका वदे सत्वरि । क्वचिद्रोग नसे शरीरि । परि एक व्यथा व्यापिली थोरि । जे न होय दूरि कवनाकुन ।८२। तदा तस्कर वदे वचनि । प्रिय सांगावे झडकुनि । जरी औषध असे नागभुवनि । आनीन तेथोनि मी सत्वरि ॥८३॥ दृढ पाहोनि तयाचे चित्त । म्हने ऐकिजेजी मम कांत । मी गेलि होति नृपासंगात । क्रीडा वसंत करावया ॥८४॥ तदा राणीचे कंठी सार । म्या पाहिला नव-रत्न-हार । उद्योत व्यापिला थोर । मनोहर अमोलिक ॥८५।। तत् हार प्राप्ति विना । जाउ पाहाते मम प्राण । जरी देशील शीघ्र आणून । तरीच म्हणीन भ्रतार मम ॥८६॥ जरी हार न आनिसि । तरि न यावे मन्मंदिरासि । जरी प्रिया मनोरथ पुरविसि । तदा प्रयोजन तुसी काय मज।८७। कटुवाक्य वदसि प्रिय । या रत्नहाराचि कथा काय । शेषमस्तकी मणि जो आहे । तो मी निर्भयपणे आणीन ॥८८॥ जरी हार देईन आणून । तरीच दाखवीन वदन । ना तरी करीन देशाटन । अथवा मरण वरीष्ट ॥८९।। ऐसा पन वदोनि वेश्यास । नृपमंदिर केला प्रवेश । चौर्यकला करोनि सावकाश । घेवोनि हारास निघाला ॥९॥ त्वरे येताचि रस्त्यात । हाराचा पडला उद्योत । तराले पाहोनि तयात । तस्करात जानीतले ॥९॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org