________________
प्रसंग एकविसावा : २७७ मुनीदर्शन पापाचा नाश । उपदेश करिती सर्वास । दशलक्षण धर्मप्रकाश । श्रावकास त्रिपन्न क्रिया ॥१३६॥ धर्म सांगे सारासार । सागार अनि अनागार । ते ऐकोनिया समग्र । वैराग्य अंतर उद्भविले ॥१३७॥ यमरायाचि जे का राणी । दीक्षा मागे कर जोडोनी। स्वामि कृपा करोनि मनि । आम्हालागुनि तारावे ॥१३८॥ कन्या समजली मनात । मम विवाह होता येथ। राज्य घेईल मम कांत । चिंता उत्पन्न मुनीरायासी ॥१३९॥ ते चिंता निवारण करीन । मनात वैराग्य उत्पन्न । सर्व पुरुष पितासमान । मजकारण दीक्षा द्यावी ॥१४०॥
यममुनी ऐसे ऐकिले । मनातील शल्य ते गेले । मुंड केवळिज्ञान जाले । लौकांतिक आले पूजनासी ॥१४१॥
जग उपदेशा कारन । विहार करि केवळज्ञान । अष्ट कर्माचे निर्दालन । मोक्षसदन प्राप्ती जाली ॥१४२।।
अंतातीत ज्ञान अनंत । अव्याबाध सुख अनंत ॥ निरंजन चिद्रूप अमूर्त । बळ अनंत ते मोक्षगामी ॥१४३॥ ऐशापरि यम मुनी । श्लोकार्द्धन श्रुतपठनी । त्याने वरिली मोक्षरमणी । कवि अज्ञानी तेचि मागे ॥१४४।। तैस स्वल्प ज्ञानाराधना । शक्तीसार करि पठना । जैन धर्माच्या जाने खुना । मार्गप्रभावना मोक्षाची ।।१४५।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org