________________
२७६ : आराधना-कथाकोष
दया उद्भवली अंतरी । गर्दभकसे काही तरी । म्यान केलेसे तरवारी । पाप भारी मुनींद्रहत्या ।।१२४|| गर्दभ काढोनी शस्त्रात । उध्वं करोनिया हस्त । तव ज्ञानोत्पन्न हृदयात । पितृघातात करू नये ॥१२५।। मारू न मारू करिति विचार । तव जाला सामाईकावसर ॥ खंड श्लोकाचा विचार । स्वाध्याय उच्चार करीतसे ॥१२६॥ प्रथमश्लोक उच्चारिला । गर्दभ मनात समजला । बुद्धि शिकवावया मला । तीर्थरूप आला ग्रामासी ॥१२७॥ पाप पुण्य त्या समजल । तव मुनीन कवित्व केल । ते उच्चारिले ज्ञान आपुल । श्लोकार्द्ध केले अध्ययन ।।१२८॥ ते पुत्र तो श्रवण करि । कुनिका आहे तळघरि । तीसि पाहावया नजरी । मम हितकारि पिता मुनी ।।१२९।। राव म्हणे प्रधानासी । न वधावे दयाळ ऋषी । तव तीसरे खंडश्लोकासी । स्वाध्याय पाठासी सामाईक ।।१३०॥ रे रे मंडूक ऐक बोला । मम भय नाहि तुजला । उसा सर्प तो बैसला । करि यत्न त्याला बुद्धिबळे ॥१३१॥ खंडश्लोक झाले संपूर्ण । ते समजले दोघे जन । मुनीसी करोनिया नमन । विघ्ननिवारण भाव भोळा ।।१३२॥ राजा समजला अंतरी । कुनिका आहे तळघरि । तत् भेद मुनी अंतरी । परउपकारी पुण्याय ॥१३३।। जानोनिया आत्महित । नमोस्तु करिती भावार्थ । आसिर्वाद देता त्याहात । ज्ञान उद्योत मुनिरायासी ॥१३४॥ सप्तमऋद्धि प्राप्त जाली । ग्राममध्ये मात गेली । विटी आणि तत् माउली । सर्वही आलि दर्शनासी ॥१३५।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org