________________
प्रसंग एकविसावा : २७५ गाथा-कट्टसि पुणु णिरके वसिरे गदहा जवं पेछसि खादि दुर्मतिः । बाळभाषा गाथा अर्थ । रे रे कृषी गर्दभ किमर्थ । पाप ना पुण्य ना व्यर्थ । निरर्थक मतिहीन रे ॥११३॥ तेथोनि चालला पुढरी । ग्रामलोक पोर सारी। खेळ खेळति नानापरि । मार्गाभीतरि ईटीदांडु ॥११४॥ कौनिका पोरे झुगारिली । ते बिलात गुप्त जाली । ते मुनीने नेत्र देखिली । पाहु लागली सैरावैरा ॥११५॥ खंडश्लोक । अण्णं च किं पलोवह तुम्हे एच्छणि । बुद्रिया छिद्दे अच्छइ कोणि आईती ॥११६॥ टीका -- मुनी म्हणे बाळकात । ईटी पडली रे भळित । ऐसे सांगोनिया त्याने । चालिला त्वरित पुढारी ॥११७॥ मागि जाता तया मुनिन । मंडूक सर्प पाहून नैन । कमळपत्रात लपून । भय धरोन राहिला तो ॥११८॥ खंडश्लोक-गाथा । अम्हादो णत्थि भयं दीहादो भयं तुम्हे ति । अर्थ-मुनी म्हणे त्या मेंडूकाला । माझे भय नाही तुला । सर्प उशासी बैसला । सांभाळि त्याला स्वबुद्धि ॥११९|| हे खंडश्लोक तीनकाळ । पाठ करि वाणी रसाळ । धर्मनगराचे जवळ । कायबळ ध्यान धरिले ॥१२०॥ ते श्रुत झाले पुत्रासी । पुत्र सांगे प्रधानासी । प्रधान म्हणे त्वं राज्यासी । घ्यावयासी हे मुनी आले ॥१२१॥ विचार केलासे दोघानी । मुनी टाकावा मारोनी । खड्गहस्तकी घेवोनी । रात्र माध्याह्नी मुनीपृष्ठे ॥१२२॥ दीर्घ मंत्री उपसी शस्त्र । मुनीसी वधावे क्षणमात्र । पाहता स्वामिसी द्वयनेत्र । शांतिसमुद्र मुनी दिसे ॥१२३॥
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org