________________
२७४ : आराधना कथाकोष
महावीर जन्मभूमीका । वंदना करि भावनीका | शांतिनाथ रामटेका । वंदु पादुका मुगतागिरि ॥ १०२ ॥ साडे तीन कोडि जेथे । मुनी गेले मोक्ष पंथ । मेंढा उद्धरला तेथ । पुण्यतीर्थ देश वन्हाड ॥ १०३॥ शिरपुरी पारीखनाथ । अंतरीक्ष आहे तेथ । वदुनिया पुण्यतीर्थ | वंदु पार्श्वनाथ कोठाळे ॥ १०४ ॥ यरोळिय कळेस्वर । कसनेरी विघ्नहार । मुनिसुव्रत तीर्थंकर | गंगातीर पैठनी वंदू ॥ १०५॥ मानतुंगी तो उंच गड । मुनी मोक्ष नव्यान्नव क्रोड | राम कृष्ण महाप्रचंड । देहे दंड दीक्षा बळि मुनी ॥ १०६ ॥
भाव पूजा करोनीया । गजपंथ तो वंदुनीया । पंचशतशे चैत्याल्लया । शत्रुंजया पूजा भावभक्ती ॥ १०७ ॥
तेथोन गड गिरिनेर । पंचकल्याण नेमीश्वर । पंचटोका भयंकर | उंच फार सप्तकोस पै ॥ १०८ ॥
आरे रे हे मना | त्रिकाळ भावपूजा वंदना | हृदयी धरी द्वयचरणा । मुक्ति अंगना इच्छा करिति ॥ १०९ ॥
तेथोनिया देशांतरे । तीर्थयात्रा केल्या फार ।
फिरता आपुले नगर । पाहिले नजर जन्मभूमि ॥ ११० ॥
एकपुरुष खररथी । बैसोनिया आलेसेति ।
T
गाढव सोडिता धान्य खाति । लुप्त होति हारितसाळी ||१११॥
यम मुनी पाहे नयन । किंचित् बुद्धि जालि उत्पन्न । खंडश्लोक केला त्यान । श्रोते जन परिसावे पै ॥ ११२ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org