________________
प्रसंग एकविसावा : २७३
गुरुद्वय अक्षर अंतरी । गुरू तारू भवसागर । गुरू गुरू हेच वैखरी । गिरिकंदरी तारि गुरू ||१०||
।
प्रथम रुखबदेवा वंदुनी । पाप नाशे देवदर्शनी । पुढे चालले तेथोनी । कर्महानी करावयासी ||११|| चालले सम्मेद शिखरा । कर्माची होतसे निर्जरा । चुके चौन्यांशीचा फेरा । भव्यनराते यात्रा होय ॥ ९२ ॥ याते जे जीव जाताती । त्याच्या कुगती चुकती । नर सुर जन्म पावती । सोख्य भोगिति स्वर्गीचे ॥९३॥ एकूणचाळीस भवात । मोक्ष त्या जीवाशी प्राप्त । यमुनी गेला त्वरित । मधुबनात राहेलासे ||९४|| तेथे प्रतिमा वंदुनिया | गुरुमंत आठवुनियां । वीस टोका वंदुनीया । कर्मक्षया सहज जाती ||१५|| तेथोनि गेले चंपापुरी । वासुपूज्य स्वामिमंदिरी । मोक्षक्षेत्र वंदना करी । कर्म अरि नष्टले तेथ ॥९६॥ तेथोनिया पावापुरीसी । वंदना करी यमऋषि । करीत तीर्थवंदनेसी । वाराणसी काशी तीर्थ ||१७|| गंगाभागिरथीसी स्नान । सुपार्श्व पार्श्व जन्मस्थान | भावपूजा भक्ति करोन । कर्मदहन करीतसे ॥ ९८ ॥ कौसल्य देश साकेतापुरी । तियसी म्हणती अयोध्यानगरी । यममुनी वंदना करी । तीर्थंकर जन्मभूमिका ॥ ९९ ॥ रुखब - अजित - संभव । सुमति अनंत चौदाव । पाच तीर्थंकरदेव | वंदना भावे पूजार्चना ॥ १०० ॥ आदिनाथ श्री भगवान । प्रयागात दीक्षा कल्याण | भावपूजा करि नमन | पुढे गमन कुंडलपुरा ॥ १०१ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org