________________
२७२ । माराधना कयाकोष
प्रथम देवाचे दर्शन । दर्शनान पापनाशन । याचे भेद अष्ट जान । ज्ञानाची खून अष्टप्रकार ॥७८॥ दशलक्षणी जैनधर्म । जीवदया त्याचे वर्म । दयाचा षटकाय धाम । स्वआत्म्यासम जानावे ॥७९॥ यतिधर्म तेरा प्रकार । त्रीपनक्रिया श्रावकाचार । व्रत नेम जे का समग्र । सांगती योगींद्र रायासी ॥८०॥ ऐस्यापरि धर्मश्रवण । करिता वैराग्य उत्पन्न । संसारि विरक्त होउन । दीक्षाकारणासी सिद्ध जाला ||८१॥ ज्येष्ट पुत्र बोलाविला । राज्यभार त्यासी दिधला । गर्दभ सिंहासनि बैसला । दिगंबर झाला राजेंद्र ॥८२॥ घेवोनिया दीक्षाभार । ते देखोनि पंचशत पुत्र । संसार जानोनि असार । गुरूसमोर उभे ठेले ॥८३॥ गुरूचा करोनिया विनय । मोक्षा जावयाचा उपाय ॥ राजपुत्र समुदाय । तरणोपाय आम्हा सांगा ॥८४॥ गुरूराय कृपा केली । अवतार दीक्षा दिधली । क्रिया सर्व शिकविली । विद्या घोकली आगमपाठ ||८५।। पुत्र झाले ज्ञानवंत । नमोकार न ये रायात । पुण्य नाही पूर्वसंचित । विद्या तयात न सुचेची ॥८६॥ यममुनी म्हणे अंतरी । माझे पूर्व कर्म भारी । पाठ न बैसे ममांतरी । कर्मवैरी मम दुर्द्धर ॥८७|| कर्म फिटे हे कसेनी । ते सांगिजे गुरूराय मुनी। सद्गुरू सांगे तयालागुनि । तीर्थाटनी कर्म नष्टती ॥८८|| तेव्हा तो यम मुनीराय । वंदुनी सद्गुरूचे पाय । एकल विहारी तो होय । पुसोनी जाय श्रीगुरूसी ॥८९।।
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org