________________
प्रसंग एकविसावा : २७१ तैसेचि राम लक्षुमण । भरत आणि ते शत्रुघ्न । याचे आहे बहु कथन । निंदावचन बोलू नये ॥६६।। पाच पांडवाची कथा । वेदशास्त्री तुम्ही ऐकता । ते विपरीत समस्ता । निंदा वार्ता बोलू नये ॥६७॥ राया ऐसेचि सर्वमत । यासी नाही आत्मप्रचित । पुण्य करिता पाप होत । ते तुम्हाते कळेचिना ॥६८॥ सुदेवाची कळे खून । सुगुरू आनि त्या सुजान । सिद्धान्तशास्त्र तीन रत्न । सुधर्म जान दशलक्षणी ॥६९॥ धर्माधर्म जन वदती । धर्माच वर्म न जानती। धर्मासाठी हिंसा करिती । कुळधर्म म्हणति त्यासी ॥७०॥ परपीडा पापाय । परोपकार पुण्याय । ऐसे वदति ज्ञानीय । न जानति सोय धर्माची ॥७१॥ राय ऐसे ऐकोनि मनि । म्हणे हे सत्यज्ञानधनी । ज्ञानमद गेला गळोनि । जेसी रजनी उदयार्क ।७२।। मिथ्यात्व अस्त होवोनिया । पूर्वपुण्य आले उदया। करकमळ जोडोनिया । सद्गुरू पाया नमस्कारी ।।७३॥ स्वामिस करीतसे विनती । मी अन्यायी मूढमती । क्षमा करावी मजप्रति । तुम्हाप्रती म्या निदिले ॥७४।। अपनिंदा करीतसे फार । जोडोनिया द्वय कर । मस्तक ठेवि चरणावर । वारंवार विनवीतसे ॥७५॥ दयावंत मुनिराय । जानोनिया आसन्नभव्य । मोक्षगामी जीव होय । सांगती सोप धर्म मार्ग ॥७६॥ धर्मवृद्धीसी देउनीया । जैन धर्म आईक राया ।। शुद्ध करी मन वच काया । मोक्षा जावया सावधान ॥७७।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org