________________
२६८ : भाराधना कंषाकोष एकदा सुधर्माचार्य । पंचशत मुनीराय । सिद्धान्तज्ञानी जेवि सूर्य । रोषे धैर्ये पंचमेरूपै ॥३०॥ ते संघाष्टक मिळोनि । आले ग्रामा उद्यानवनी । श्रत झाले श्रावककर्णी । चालले दर्शनी समुदाए ॥३१॥ श्रावक सम्यक्त्वी अपार । वस्त्राभरणी अलंकार । वाद्यनादाचेनि गजर । हर्षे निर्भर नरनारी ॥३२॥ एक येती एक जाती। राये देखिले अवचिति । म्हणे हे कोठे जाताती । कवनाप्रति पूजावया ॥३३॥ तेव्हा मिथ्याति प्रधान । राया सांगे बुद्धिहीन । याचे गुरू असति नग्न । ज्ञानभान पुण्यप्रतापी ॥३४॥ ऐकोनि प्रधान उत्तर । राजा खोचला अंतर । म्हणे मी ज्ञानी अपार । मज समोर कोन दुजा ॥३५॥ ज्ञानगर्व धरोनिया । मान मनी आनोनिया । ब्राह्मणमंत्री मिळूनिया । चालले तया वनामध्ये ॥३६॥ पाहिले त्यानी दुरून । श्रावक करिती पूजन । स्वामी वदति श्रृताख्यान । मानमर्दन मिथ्यातीचा ॥३७॥ अभिमानी चढला मदा । महापुरुषाची करि निंदा । नग्न गुरू दरिद्री सदा । बुद्धीमंद वस्त्रहीन ॥३८|| यास न मिळे अन्नपान । उपासी वस्ति अरण्य । या कैचे अपरोक्ष ज्ञान । भोळे जन पूजा करिती ॥३९।। ऐसे म्हणोनि समीप आला । मुनीसी वाद करू ठेला । म्हणे लाज नाही तुम्हाला । नग्न बैसला स्त्रियापुढे ॥४०॥ तुमचे देवा वस्त्र नाही । तैसेच दिसता तुम्हीही । मूढलोक हे सर्वही । कंद मूळ नाही खावयासी ॥४१।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org