________________
प्रसंग एकविसावा । २६९
आमचा देव चक्रधर । ब्रह्मा विष्णु महेश्वर । देव देवी अनेक प्रकार । पुत्र पौत्र भाग्यवंत पै ॥४२॥ गुरू जानावे बृहस्पति । सांदीपान वेदमूर्ति । वैशंपायन वेदान्ती । ज्ञान पढती अपरोक्षे ॥४३॥ मार्कंडेय ऋषि जान । साटि खंडयाच भोजन । शुकमुनी तपप्रवीण । गर्भी जयान तप केलं ॥४४॥ द्वादशवर्षे माते उदरी । शुक मुनी तपस्वी भारी । ऐसे अनेक पृथ्वीवरी । पुराणांतरी सांगितले ॥४५॥ उद्धव अक्रूर विदुर । बगदालभ्य ऋषीश्वर । चाही वेद मुखोत्तर । गंगाधर गणपती ॥४६॥ वाल्मीकी आनि सांदिपनि । जान कथिले रामायण । वशिष्ठ ऋषि सूर्यासमान । कश्यप महाप्रतापी ॥४७॥ दुसरी सृष्टी करणार । तुमचं ज्ञान अम्हा म्होर । तुम्ही हिंडता पृथ्वीवर । घरगुहार कैचा मठ ॥४८॥ कैच वस्त्र नाही लंगोटी । द्रव्य कैच तुम्हागाठी। सदा वनवासी हिंपुटी । पत्नीपुत्र ललाटी कैचे ॥४९॥ ऐशापरि तो राजेंद्र । वाग्जाळ वदतसे फार । काही न पाहे मागे म्होर । जैसा गवार बडबडि ॥५०॥ मौन राहले ते मुनी । शिष्या बोले तयालागुनि । देव म्हणता अघटित कणि । गजवदनि प्रथम देव ॥५१॥ तोही नव्हे शंकराचा । पुत्र नव्हे पार्वतीचा। आकार केला मळाचा । देव तुमचा तोचि जाला ॥५२॥ देव म्हणता हरिहर । ब्रह्मा विष्णु महेश्वर । त्यास कलंक आहे फार । देव थोर तुमचा की ॥५३॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org