________________
प्रसंग एकविसावा : २६७
रमण म्हणे रमणीय । चितेचा कठीण उपाय । तो तुझियान न होय । मनचे सांगु नये स्त्रियेसी ।।१८।। श्लोक-आत्मबुद्धि हितार्थाय, गुरुबुद्धिः विशेषतः । परबुद्धि विनाशाय, स्त्रीबुद्धिः प्रलयंकरा ।।१९।। राणी म्हणे स्वामीजी राया । तुझी दुखिस्त झालिया । आम्हासी सुख कोठोनिया । दुर्घट उपाया मी करीन ॥२०॥ राजा म्हणे देइ वचन । भाश दिधली राणीन । पतिव्रता जे कामीन । भ्रतारवचन न उल्लंघी ॥२१॥ राजा म्हणे वो ऐक आता । कन्येचे जरी लग्न करिता । तो राज्य घेईल त्वरिता । मरण अवस्था आमची गे ॥२२॥ जरी खोटी बुद्धि करन । बाळहत्या पाप दारुण । वनांतरि द्यावि टाकून । अपकीर्ति जान जगात ॥२३॥ यास उपाय करि कामिना । मम झाली बुद्धि भ्रमना । मम मनाची मनरंजना । अभयदाना मज देई गे ।।२४।। राणी म्हणे हे स्वल्प आहे । तुम्ही असा आता निर्भय । याचा सहज मी उपाय । दाखवीन सोय तुम्हासी ॥२५॥ त्या राणीन उपाय केला । तळघरात ठाव दिधला । निपुणमति दासीला । सांगितला गुह्यविचार ॥२६॥ तुला मला राजियासी । न सांगावे चौथियासी । नित्य द्यावे भोजनासी । ज्ञाने तिएसी रंजवावे ॥२७॥ ऐसी करोनिया गुप्त । नृप झाला निर्भयवंत । निरंतर राज्य करीत । मिथ्यामत हृदयांतरी ॥२८॥ कुगुरू कुशास्त्र कुदेव । कुज्ञान जडला कुभाव । कुबुद्धि गर्व नृपराव । ज्ञानगर्व पंचमिथ्याती ॥२९॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org