________________
प्रसंग विसावा । २६१
सेटीस आला तो शरण । तारि तारी मजकारण । सेटि ध्यान विसर्जून । अभयदान राया देतसे ॥१५३।। यक्ष उठवि रायसैन्य । ते सर्वही आले धावोन । सेटि पुसे काय कारण । यक्षान सर्व निवेदिले ॥१५४॥ रत्नजडित सिंहासन । वर बैसले सुदर्शन । यक्षे दिव्यवस्त्राभरण । करि पूजन पुष्पवृष्टी ॥१५५।। यक्ष नमस्कार करोनि । तो गेला आकाशगमनी । ते पाहिले सर्वत्रजनी । आश्चर्य मनि करताती ॥१५६।। राणीस कळला समाचार । क्रोधबंध बांधला बैर । त्या पाडळपुर नगर । शाली व्यंतर देवता वनी ॥१५७।। राणीची पंडिता जे दासी । तेहि आली पाडळिपुरासी। देवदत्ता जे वेश्यापासि । वर्तमान तिसी सर्व सांगे ॥१५८॥ तीन करोनिया पन । ते म्हणे राणी काय जाने । मी त्याचे तप ढाळीन । मोहोनी घालीन देवाऋषीशी ॥१५९॥ राजा सुदर्शन जेथ । सर्वनगर लोक तेथ । धात्रीवाहन जोडि हस्त । विनती करीत सुदर्शना ॥१६०।। न जानोन उपसर्ग केला । क्षमा करोनि तारा मजला । अर्धराज्य देतो तुम्हाला । सांभाळा आम्हाला दयाब्धि ॥१६१॥ सेटि म्हणे धिक् संसार । आम्ही घेउ संजमभार । बोलाउनि सुकांत पुत्र । रायाचे करे दिधला ॥१६२।। चैत्याल्ये वनि जावोनी । पूजा विधि स्तुति करोनि । तेथे विमळवाहन मुनी । त्रिप्रदक्षिणा नमोऽस्तु ॥१६३॥ आशीर्वाद घेवोनिया । पृच्छा केलि स्वामिराया । मनोरमा मम मनःप्रिया । सांगावे त्वया भवावळी ।।१६४।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org