________________
२६० : भाराधना-कथाकोष
ते रायासी सर्व सांगति । क्रोध आला नरेंद्राप्रति । अविचार दूता म्हनति । स्मशानांऽति शिर छेदावे ।।१४१॥ दूत धावले जैसे व्याघ्र । सुदर्शन धरला जेवि चोर । स्मशानी नेवोनि सत्वर । उपसिली शस्त्र तीक्ष्ण ॥१४२॥ ते पाहोन जनाचा मेळा । अश्रुपात ढळति डोळा । अहो हो सुदर्शन भोळा । कैसी वेळा त्याहासी आली ।।१४३।। रुदन करिति नारी नर । शस्त्र चमके भयंकर । रायाचा आला समाचार । शिर सत्वर छेदावे वेगी ॥१४४॥ तत्समयी काय वर्तले । जिन यक्षासन कंपिनले । तया सर्वहि समजले । त्वरित आले भूमंडळी ।।१४५।। दूत जव शस्त्र मारिती । शस्त्राचे पुष्पहार होताती । दूत रायासि सांगति । राव म्हनति छेदावे सीर ॥१४६॥ अनिक सुर धावविनले । क्रोधे नेत्र वोटारविले । तैसेच तेथे खिळले । उभे ठाकले उर्ध्वहस्ते ।।१४७।। ते ऐकिले रायान कर्ण । आनिक शूर पाठविले त्यान । तेही खिळिले यक्षान । सैन्य घेवोन आला राजा ॥१४८॥ यक्षानहि मावकेली । चतुरंग सेना सिद्ध जाली। निर्बंधी रायान पाहिली । म्हणे कौटाली सुदर्शन ॥१४९॥ हाणा मारा काय पाहाता । संग्राम झाला अगणिता । सर्व मूच्छित यक्षकर्ता । रणाआतौता एक राजा ॥१५०॥ राजा मागे पुढे पाहे । मला कोन्ही न दिसे सहाय । हृदयी संचरले त्या भय । तत् समय शरण यक्षासी ॥१५॥ यक्ष म्हणे वधीन तुला । शरण जा सुदर्शनाला । मग तो भ्याला मरणाला । पाठी लागला यक्षराय ॥१५२॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org