________________
प्रसंग विसावा : २५९ स्मशानभूमिके जाउनी । कायोत्सर्गी उभा ध्यानी। सर्व वस्त्र उतरोनी । दिगंबर ध्यानि निर्भय ॥१२९॥ ते दासी त्या ठायासी गेली । स्वरूप देखोनिया भुलली। त्यासी विनोद करू लागली । नग्न झालि आपनही ।।१३०॥ नाना उपद्रव करीत । ते लज्जा पावली मनात । सावध होवोनि चित्तात । म्हणे मम तात समान ।।१३१॥ मग तिन वस्त्रे घेवोन । संदकी सुदर्शन घालोम । पुष्पमाळा वरे सोडोन । सुगंध सुमन दशदिशा ॥१३२॥ आनोन दिधला राणिपासी । म्हणे भोगावे तुवा यासी। मग ते राणी म्हणे तयासी । सावध चित्तासि व्हावे हो ॥१३३।। अभयमति नानापरी । विनोद चेष्टा कामविकारी । परि तो चळे ना शरीरी । पर्वतगिरि समान तो ॥१३४॥ राणी म्हणे पंडितासी । बाहेर टाकावे त्वा यासी। ते म्हणे उपाय मजसी । या वेळेसी समजे ना गे ।।१३५।। दिन उगवल्यावरि । तूच काही तरि करी । आपन गेलि बाहेरी घरी । निद्रा करि निश्चित मन ।।१३६।। राणी विचारि मनात । निशि सरली समस्त । नखे विदारी शरीरात । केले वस्त्रात छिन्न भिन्न ॥१३७॥ स्त्रीचरित्र अनिवार । शंखध्वनि केला गजर । ते ऐकोन धावले हेर । सेटि नजर देखिला ।।१३८॥ राणी म्हणे लोकाकारण । मी पतिव्रता हो कामीन । येथे येवोन सुदर्शन । मजकारन झोंबू पाहे ॥१३९।। मी भली झोंबली तयाला । आता कैसा ध्यानी बैसला । अरेरे सांगा रे रायाला । म्याच राखला देह माझा ॥१४०॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org