________________
२६२ : भाराधना कथाकोष
व्याघ्र भिल्ल होता वनी । कुरंगी स्त्री त्याचि भीलनी । पापाश्रय गेली मरोनी । श्वान श्वानि पशु जन्म ।। १६५ ।। तेथ मृत्यु पावोनिया । म्हैसा झालि घरि गौळिया । त्या शेजारी चैत्यालया । जातिस्मरतया पश्चात्ताप ॥ १६६॥ तेथोनि चंपापुर नगरी । जन्म जाला त्या नीचाधरी । माता पिता यमपुरी । आपदा भारि मृत्यु झाला ॥१६७॥ तेथेच त्याचा जन्म जाला । सुभग गोवळ नाम त्याला । वृषभसेटि घरि राहिला । चारू लागला गोधन तो ।। १६८ ।। चारणमुनी त्या भेटले । पाप त्याचे सर्व गेले । सेवा करिता पुण्य जडले । संतोषले सद्गुरूराज ॥१६९॥ निकट भव्य जानोनिया । नौकारमंत्र सांगे तया । मंत्र जपता मृत्यु तया । पुत्र त्वया वृषभसेटि ॥ १७० ॥ नामाभिधान सुदर्शन | मनोरमा पुरवील पुण्य । नौकारमंत्र महिमान । पुत्र निधान सर्व प्राप्त ॥ १७१ ॥ मुनीमुख भव ऐकोनि । वैराग्य दुनावले मनी । सर्व संग परित्यागुनि । दिगंबर मुनी जाहाले ।। १७२ ।। राजा धातवाहन नृप । हृदयी करी पश्चात्ताप । धिक् स्त्रिया महापाप । चित्ति विकल्प अनृत सर्व ॥ १७३ ॥ राजा जाला दिगंबर । राजी बैसविला पुत्र | सुकांत तो सेटिचा पुत्र । राज्यकारभार तयासी ॥१७४॥ कित्येक राण्या झाल्या अर्जिका । दीक्षा घेति कैक श्राविका । उपरति जाली श्रावका । घेती निःशंक संजम ते ॥ १७५॥ कित्येक घेति नेमव्रत । तजोनिया मिथ्यामत | जिनधर्म हा सत्यसत्य । देव अरिहंत एकचि ॥ १७६ ॥
1
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org