________________
२५२ : आराधना कथाकोष
टीका-अंतकाले निदानबंधन । वृषभश्रेष्ठीचा पुत्र होईन । मंत्राचे प्रभावे करोन । गर्भ उत्पन्न अहँदासी ॥४५॥ जिनमति पश्चिमरानी । पंच स्वप्न देखिले नेत्री । मेरू कल्पवृक्ष पवित्री । देव विमान न जरी पाहिले ॥४६॥ क्षीर समुद्र निधूम अग्नि । हर्ष जाला हृदयभुवनी । ते शुचिर्भूत होवोनी । भ्रतारालागोनि सांगत ॥४७।। रमण म्हणे वो रमणीए । चैत्याले आहेत मुनिराए । चाल जाउ तया जिनालये । पाहू पाय तीर्थंकराचे ॥४८॥ न्हवन पूजा अष्टविध । करिते झाले भावशुद्ध । चरणी आरति गीत प्रबंध । गंधोदक शुद्ध वंदिले ॥४९॥ मग येवोनि गुरूपासी । पंचांग नमोऽस्तु स्वामिसी। पादपूजा करोनि त्यासी । स्वप्न फळासि पुसति दोघं ॥५०॥ मुनि वदे मेरूचे फळ । पुत्र धीर गंभीर होईल । कल्पवृक्ष लक्ष्मी भोगील । विमान देखील शूर पूजनीक ॥५१॥ समुद्र देखिला त्वा नयनि । पुत्र गुणरत्नाचि खानि । निर्द्ध म देखिला जो अग्नि । कर्मकाष्ठाग्नि भस्म करील ॥५२॥ मदनरूपी कामदेव । मोक्षगामी तो पुत्रराव । ऐसे वदले मुनीराव । उभयता भाव ऐकिले ॥५३॥ ऐकोन हर्ष जाला चित्ती । दोघही आली गृहाप्रति । दिवस-मास-गर्भ-उत्पत्ती । पौष शुद्ध चौति पुत्र जाला ॥५४॥ नाम ठेविले सुदर्शन । प्रौढ झाला चंद्रासमान । विद्या सिकला पूर्वपुण्य । रूप लावण्य बृहस्पति ।।५५।। तग्रामी पुरोहित ब्राह्मण । तत्पुत्र कपिला सगुण । कपिला अनि सुदर्शन । मित्र जिनगुण पढताति ॥५६॥
For Private & Personal Use Only
Jain Education International
www.jainelibrary.org