________________
प्रसंग विसावा : २५१ काय आमची मूल पढति । किंवा श्रावक जाप्य करिति । श्रावकनीहि मंत्र जपति । तेच चित्ति धरिले काय ॥३३॥ सांग सांग रे तू गोपाळा । मंत्र लाधला रे कवणे स्थळा । की कोन्ही मुनिस्वामि भोळा । मंत्र शिकविला तुजसी ॥३४॥ हा मंत्र भवाब्धितारक । नृ-सुर-मोक्षाचा दायक । मुनिजनादी हाचि ज्यपक । सुखदायक अनेकापरी ॥३५॥ याच मंत्र तीर्थंकरदेव । याच मंत्र इंद्रपद व्हाव । याच मंत्र कामदेव । षट्खंडराव चक्रवर्ती ॥३६॥ सर्व सुख भोगोनि । अंती पद शीवरमणी । ऐसा मंत्र तुजलागुनि । कवने ठिकाणी लाधला रे ॥३७॥ सुभग सांगे सेटिकारणे । मुनीचा सर्व वर्तमान । म्हणे हा प्राणी धन्य धन्य । पाहिला नयन चारणमुनी ॥३८॥ श्रेष्ठी बहुत प्रशंसा करी । आहार वस्त्र नानापरी । तयाचि बहुत प्रीत करी । गोपाळ अंतरी जपे मंत्र ॥३९॥ कवने एकिय अवसरी । गोधन चारिता गंगातीरी । गाईम्हैसी पैलतीरी । जाताचि हेरि सांगितले ॥४०।। घाबरा होवोनिया तोही । त्वरे चालला लवलाहिं । मंत्र जपतसे हृद्देही । गंगेत पाहि झेपावला ॥४१।। गुप्त काष्ठ वाहात होत । ते पार जाहाले उदरात । जैसा शत्रु करी घात । वैर चित्तात स्मरोनिया ।।४२।। प्राण जातावेळी त्याची मति । वृषभदासा पुत्रोत्पत्ती। मी पुत्र होईन ऐसा चित्ती । मति गती तेचि जीवासी ॥४३॥ अंतःकाले च मामेवं, स्मरण मुक्ताकलेवरः अंतर्मुहुर्त उत्पन्न शुभाशुभ भवत्यपि ॥४४॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org