________________
२५० । आराधना - कथाकोष
प्रातःकाळ झालियावरि । मुनी ध्यान विसर्जन करी । अवधिज्ञाने पाहे अंतरी देखिला न जरि अस भव्य ॥ २२॥ निकटभव्य पुण्यवान । स्वामि वदति तथा कारन | त्वा काही ऐक नेम घेण । मंत्र तुजकारण सांगतो ||२३|| नमो अरिहंतानं इत्यादि पंच नमोकारं ।
1
सांगति त्यासि गुरु मंत्रं ।
हा जपावा अहोरात्रं । हृदयांत दृढ धरावा ॥ २४ ॥ ऐसा दिधला त्यासि मंत्र । जो का स्वर्गमोक्ष देनार | ज्या मंत्रे सुख अपार । इंद्र अमर पदवी प्राप्त ॥ २५ ॥ ज्या मंत्रे चक्रवर्ती होती । नारायण पदवी प्राप्ति । त्रिखंडराज्यपद भोगिती । तीहि लोकि कीर्ति मंत्रयोग ||२६||
या मंत्राचे ऐक अनुपान । मिथ्यात्वी कोन्हा न सांगन | अशनि शयनि भोजन । करि मनन हृदयांतरी ||२७||
मंत्र सांगोन तयासी । नभमार्गे गेले ते ऋषी । गोपाळ पाहातसे तयासी । आश्चर्य मानसी करितसे ॥ २८ ॥ धन्य धन्य गुरुराय | आता केव्हा दरशन होय । मंत्र धरोनिया हृदय । चालला स्वयं मंदिरासी ||२९|| गोपाळा तदा अंतरी | सदैव मंत्रध्यास करी । जे जे कार्य करि मंदिरि । तव तव उच्चारी मंत्रराज ॥३०॥ एकदा ऐकिले श्रेष्ठिन | नौकारमंत्र करिता पठन । आरे गोपाळा तुजकारण | मंत्र विधान कोठोनिया ॥ ३१ ॥ आम्ही करितो देवपूजा । ते त्वा ऐकोनिया रे सहजा । किंवा देखिले गुरूराजा । मंत्रकाजा प्रवर्तलासि ॥३२॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org