________________
प्रसंग विसावा : २४९ चतुसंघ मेळउनि । यात्रेसी जावे घेवोनि । प्रतिष्ठा करावि जिनभुवनी । तुर्यदानी धन खर्चावे ॥१०॥ केवळवाणी सिद्धान्त । शास्त्र पूर्वाचार्यकृत । धन खर्चावे मनइच्छित । तेन जीवाते सर्वसुख ॥११॥ ऐसी वृषभदास वाणी । क्रियवंत तो ज्ञानधनी। त्रिकाळपूजा देवदर्शनी । दिनरयनी निमग्न पै ॥१२॥ तयाचे गृही एक गोपाळ । सेटि करितसे प्रतिपाळ । गाईम्हैसीवच्छसकळ । अरण्यस्थळ नेत असे ॥१३॥ एके दिवसी तया वनात । पश्चिमदिसि दिनकर अस्त । चारणमुनि आले तेथ । बैसले ध्यानस्थ दिगंबर ॥१४॥ त्याहासी पाहिल गोपाळान । शिळेवरी अधर चरण । किंचित् होते पूर्व पुण्य । जवळ येवोन पाहे नयनी ॥१५॥ अहो हे मुनींद्र कैसे पाहि । यासि वस्त्र एकही नाहि । आता कैसे करावे काहि । दुसरे नाहि मज वस्त्र ॥१६॥ एक माज्या अंगावरी । आणिक असत देतो तरी । मनामध्ये विचार करी । दया अंतरी उद्भवली ॥१७॥ तैसाच गेला तो गृहासि । मनि आठवी मुनिरायासी । होता दोनप्रहर निशी । चालला वनासी गोपाळ ॥१८॥ शीतकाळात जानोनिया । काष्ठभारा घेवोनिया । अग्नि घेतला तापावया । आला लवलासा मुनिपासी ॥१९॥ मुनी पाहिले दिगंबर । सीतकाळ महादुर्धर । काया वेष्टित तुषार । तो स्वकर त्वर पुसीतसे ॥२०॥ दोहि करि करी मर्दन । सेवा करी भाव धरोन । मग प्रदीप्त केला अग्न । उष्ण उष्ण तो हस्त स्पर्शी ॥२१॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org