________________
प्रसंग विसावा । २५३ त्याही नगरामाजि थोर । सागरदत्त क्षेष्ठी चतुर । सागरदत्ता स्त्री सुंदर । झाली गरोदर पूर्वपुण्य ॥५७॥ वृषभदास सागरदत्त । सहज गोष्टी करीत होते । सुदर्शन पाहिला अवचित । स्वरूपवंत कामदेव ॥५८॥ सागरदत्त म्हणे श्रेष्ठीशी । पुत्री होईल आम्हासी। ते देउ तत् आत्मजासी । सत्यवचनासी मानिले ॥५९॥ अनुक्रमे झाली पुत्री । रूपवंत इंदुगात्री। जातकर्म द्वादशसूत्री । गृह पवित्री सर्वहि जाले ॥६०॥ जिनालयासी जावोनी । न्हवन पूजा देवांगणी । विधीयुक्त सर्व करोनि । नामाभिधानी मनोरमा ॥६१॥ महानंदे ते दिनदिन । वृद्धी झाली वय यौवन । कपिला आणि सुदर्शन । एक दिन क्रीडा करिती ॥६२॥ मनोरमा तद्दिवसी । जात होति जिनदर्शनासि । सन्मुख देखिले सुदर्शनासी । विह्वळ मानसी जाहालि ते ॥६३॥ नैना नैन अवलोकन । हृदय भेदले चक्षुबाण । परस्परे मदनोत्पन्न । मूर्छा येवोन सावरीती ॥६४॥ सखि सहित गृहासि गेलि । विरहताप विह्वळ झाली । सेजेवरि ते पहुडली । सखी समजली अंतरात ॥६५॥ माता पिता आले त्वरेन । काय झाली गे झडपन । बाई सांगावे मजकारन । वारा विंझन घालिताति ॥६६॥ तैसेच झाले सुदर्शना । जावोनिया अपुले सदना । विरहतापाची वेदना । मंचक शयना पहुडला ॥६७॥ मात पिता पुसताति । बारे कैसी झाली गती । ते सांगावे आम्हा निश्चिती । तैसीच युक्ती करू बाळा ॥६८॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org