________________
२४४ : आराधना - कथाकोष
ज्या नरासी नाही निश्चय । त्यासी पुण्यक्षेत्र काय । अभव्य जिवासी ऐसे होय । सुपुण्य सोय न लभे त्या ||३५|| ज्यासी निश्चयाचे नाही बळ । त्यासी केचे प्राप्त शुभफळ । ऐसे वदती शास्त्र सकळ । निश्चय अढळ देवगुरू ||३६|| राजा विचारी अंतरी । जय जय वासुपूज्य चंपापुरी । हस्ती चालला पुढारी | कर्दमाभितरी || ३७॥ तयाचे धैर्य देखोनिया । खगेश काढी अपुली माया । प्रगट मैत्री होउनिया । भेटले तया भूपतीसी ||३८|| धन्य धन्य राया भक्ती शूर | धन्य सम्यक्त्व दृढतर । निश्चयाचा जेवी का मेर । प्रशंसा थोर करिती ते ॥३९॥
राये सन्मानिले आदरे । बैसोनी सांगती भवांतर । पूर्वजन्मीचे जे समग्र | तेथील मैत्र तुम्ही आम्ही ||४०|| रायासी दिव्य अलंकार । आनिक दिधला रत्नहार । सर्व रोग निवारणार | योजन भेर देते झाले ॥४१॥ जैनधर्मा प्रीतीस्तव । देवोनी स्वर्गा गेले देव ।
मग ते तुर्यसंग सर्व । चालले देव पाहावया ॥ ४२ ॥ जय जय शब्द उच्चारिती । विघ्न बारा वाटा पळती । सर्वकार्य सिद्ध होती । मनोरथ पूरती मन इच्छा ||४३|| ऐसे भव्य जीव जाणोन । कुळीचा सद्गुरु ओळखून । सुदेव परीक्षा करोन । सुशास्त्र श्रवण करावे ||४४|| श्लोक | नास्ति अर्हत् परो देवो । धर्मो नास्ति दयापरः । तपनास्ति निद्र्थश्च । एते सम्यक्त्वलक्षणाः ॥ ४५ ॥ देव जाणावा अरिहंत । जो अरिचा करि निःपात । अठरा दोषाविरहित । छताळीस गुणवंत देव ॥ ४६ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org