________________
प्रसंग एकोणिसावा : २४५ सर्वभूतासी दयाभाव । प्रीति पाळावे जीव सर्व । दशलक्षण धर्म वैभव । दया मार्दव धर्मसत्य ॥४७॥ गुरु जाणावे निग्रंथ । पंचवस्त्राचे विरहित । पंचाग्नी आंतरबाह्यत । प्रपंचविरहित तपस्वी ॥४८॥ ऐसा राजा भक्ति प्रवीण । हृदयी संतुष्ट होऊन । जै जै शब्द उच्चारोन । विघ्नहरण जैनधर्म ॥४९॥ सिद्धी होताती सर्वकार्य । यासी नाहीच संशय । संतुष्ट झाला पद्मराय । हर्ष न माए हृदयांतरी ॥५०॥ दुरून देखीली चंपापुरी । जेवी इंद्राचीच नगरी । वहानाखालुता उतरी । वन्दन करीत परोक्ष ॥५१॥ जै जै शब्द उच्चारोनी । सप्तपाद पुढे जावोनी। साष्टांग नमस्कार करोनी । पंचगुरु वदनी उच्चार ॥५२॥ मग चरणचाली चालले । चंपापुरीमध्ये आले । समवशरण देखते झाले । संतोष पावले मंगळीक ॥५३॥ श्लोक । मानस्तंभा सरांसि प्रविमल-जल-सत्
खातिका पुष्पवाटी । प्राकारो नाटयशाळा द्वितयमुपवनं वेदिकांतलज्जाद्या शाल: कल्पदृमानां सुपरिवृतवनं स्तूपहावली च । प्राकारः स्फटिकोन्तर्नृत्सुरमुनिसभा पीठिकाग्रे स्वयंभूः ॥५४॥ समोसरणी बैसले देव । विमानरूढ आले इंद्रराव । शत इंद्र धरोनिया भाव । पूजिती देव पदद्वयं ॥५५।। स्वामि त्रैलोक्य पूजनीक । धर्म-तत्त्व-उपदेशक । महामिथ्यात्व-विनाशक । मोक्षदायक परमात्मा ॥५६॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org