________________
प्रसंग एकोणिसावा : २४३
चंपापुरी नाम नगर । तेथे वासपूज्य तीथंकर । जेवी कोटी सूर्यभास्कर । उष्कृट दातार मोक्षदाता ॥२३॥ त्याहासी झाले केवलज्ञान । अनंतवीर्य गुण निधान । अनंत बळ त्या कारणा । कारण मेरुसमाना पुरुषोत्तम ॥२४॥ तदानकार्ये मुनिवाक्यम् । कृपाहृदयी प्रीतीदायकम् । तत्पादवंदने च हारकम् । मुक्तीदायकं तीर्थराज ॥२५॥ तत्मुनीशी करोनी नमन । मम इच्छा वासपूज्य दर्शन । मुर्वचन, शीघ्रगमन । अशीर्वचन मुनिगत्वा ॥२६॥ तेव्हा राय अनंदभेरी । देवोनी चालला सहपरीवारी । चतुरंगसेना छत्र चामरी । सर्व नरनारी तुर्य संग ॥२७॥ तत्समये आकाशमार्गी । चालले होते द्विखग।। पूर्वजन्माचे मित्र दोघ । भूमिभाग पाहिले त्यानी ॥२८॥ अवधी जानोनी अंतरी । विश्वभूती तो धनवंतरी । नृपाचे भाव अंतरी । कैसापरी तो पाहू आता ॥२९॥ म्हणोनी उतरले खालूते । विक्री अधि झाले करी ते । त्याचे पाहावया सम्यक्त । पुढे मार्गात काय केले ॥३०॥ विक्राळरूप भुजंग झाला । रायापुढे अडवा गेला। शिरी छत्रासी भंग झाला । अग्र लागला ग्रामायका ॥३१॥ वायु सुटला महाधूळी । पाषाण उडती अंतराळी। मेघवर्षे धारामूसळी । विद्युत तम महितळी कर्दम ॥३२॥ ते देखोनिया समस्ती । प्रधान आणि सेनापती। अपशकुन झाला म्हणती । न जावे पुढती राजेश्री ॥३३॥ से एकांती राजीयान । म्हणे हे ही सत्यची जाणा। तीर्थयात्रेस करीता गमन । त्राता तारन तोची तो ॥३४॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org