________________
२४२ : आराधना कथाकोष
देखता झाला शशकनेणी । तया पृष्टे आस्व उडाणी । धावत काकीण वनी । काळगुंफा लोचनी दृष्टया ॥ ११॥ तेथे पूर्व पुण्य करोन । मुनींद्र देखीले रायान । त्याहाचे होताच दर्शन । आनंद मन न समाये ॥१२॥ दैदीप्यमान देखोनिया । तपस्वी धारी रत्नत्रया । स्फुरकांती सुवर्णमया । जेवी सूर्या अरुणोदयी ॥ १३ ॥ स्वामि पाहोनीया अद्भूत । उतरले आस्वार नालूल । वाग्दोर धरोनीया हस्त । वृक्ष मुळाते बांधिला ॥ १४ ॥ राय करकमळ जोडोन | पंचांग नमोस्तुस्ति त्रीशुद्धीन । त्रिवार मुखे उच्चारुण । आशीर्वचन धर्मवृद्धी ॥१५॥
राजिंद्र सन्मुख बैसला । मुनिंद्र कैसा त्याने देखीला । जैसा शांत लोण्याचा गोळा । त्या पदकमळे पाहतसे ||१६||
धर्म ऐकिला संपूर्ण । क्षमा आदि दशलक्षण । तत्व पदार्थ जिनगुण । करीती पूजन शतइंद्र ॥ १७॥ ते ऐकोनिया समस्त । राजा विचार करी मनात । धन्य मुनिराज गुणवंत । उपदेशवंत आनुपमे ॥ १८ ॥ मग करकमर जोडोनिया । पुसता झाला स्वामिराया । तुम्ही आले ते कोठोनिया । कवने ठाया गमनार्थं ॥ १९ ॥ भो मुनि जगदोद्धार | जैनधर्म बुधी सागर । तुम्हास मान तपस्वी शूर । उत्कृष्ट सूर पुरुषोत्तम ||२०|| कोणी या पृथ्वीतळी । सर्वज्ञ जैसा ज्ञान हेळी |
संदेह मम हृदयकमळी । निवारण वक्त्रकमळी सांगावे ॥२१॥ तत्श्रुत्वा धर्मधीश मुनि । सांगते झाले तत्त्ववाणी । श्रुणुत्वंम भो महिनाथधनी । या मेदनी मगधदेश ||२२||
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org