________________
प्रसंग एकोणिसावा
श्री जिनात्रिजगन्नाथासी । समचिते अष्ट विश्वासी। पुन्हा वंदना करोनी न्यासी । भाव मानसि दृढतर ॥१॥ देव गुरु वंदोनिया। नमन वागेस्वरिमाया। वरदहस्त देई मला । कथा करावया प्राकृत ॥२॥ प्रसन्न होवोनी सरस्वती । अभय दिधले मजप्रती। गुरुकृपेची झाली स्फूर्ति । कवित्व मति करावया ॥३॥ पज्ञान श्रोते सावधान । जिनगुणकथा करा श्रवण । आत्महित होवे जेन । मोक्षगमन अनुक्रमे पै ॥४॥ मागदेशाच्या त्या भीतरी । मिथुळाया महानगरी। धर्मवंत नांदति सहपरि । दानाचारी करिती पूर्ण ॥५॥ नित्यनेम देवदर्शन । दर्शनं पापनाशनं । श्रावक श्राविका मिळोन । मार्गप्रभावना करिताती ॥६॥ राजाराणी दोघ दंपति । पूर्व पुण्य सुख भोगिती । विख्यात जाली त्याची किर्ती । राज्य करीती मुग्ध मानस ॥७॥ एकदा तो वनक्रीडेस । पाप उद्भवले मानस । ताकीद केली सकळास । धरोनी स्वापदास आनावे ॥८॥ सैन्य धाविले चहूकडे । खेखाळती चपळ घोडे । वावा घेती एकाकी पुढे । धुरोळा उडे आकाशमार्गे ॥९॥ राजा तुरुंगमावरी स्वार । चंचळ जेसा तो पक्षींद्र । पवनवेगे तो राजींद्र । गेला दुस्तर निबिड वनी ॥१०॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org