________________
२४० : आराधना - कथाकोष
तयासी पूजिति सकळ सुर । खेचर आनि विद्याधर । भूचर जे का चक्रधर । राज्यादि नरेंद्र प्रपूज्य ॥१०६॥ ऐसा जो त्रैलोक्यनाथ । तयासि पूजिति भावार्थ । देवगुरूशास्त्रार्थसमस्त । पूर्ण मनोरथ तयाचे ।। १०७ ।। लक्ष्मी तयासी अखंडित । संसार सदा यशवंत । पुत्रपौत्र स जयवंत । कीर्ति अद्भुत धरातळी ॥ १०८ ॥ श्रोते व्हावे सावधान | जिनधर्माचे महत्त्व पुण्य । सदासर्वदा मनि धरन । क्षमा संपूर्ण पाळावि ।। १०९ ।। पुढील अध्यायी निरोपन । पद्मरथ रायाचे वर्णन | रसाळ आणि पुण्यपावन । करिता श्रवण सुखप्राप्त ॥ ११०॥ अहो हे कथा प्रौढ बहुत । मज न कळे ईयेचा अंत | जैसा समुद्र अथाकवंत । नेत्र फिरत तदर्शिताचि ।। १११ ।। तैसा हा शास्त्रसमुद्र । अथाक जीवनकथा समग्र । मज दिसति भयंकर | अभयदातार गुरूराय ॥ ११२ ॥ तत्कृपा तेचि जहाज । त्यामाजि बैसोनिया मज । समुद्रतराव पाय सहज । लाविति मज पैलथडि ॥११३॥ इति श्री हा कथाकोष । श्रवण करिता पापनाश । शुभदायक भव्य जीवास । मोक्ष जावयास हाच मार्ग ॥ ११४ ॥
इति आराधना कथाकोशे रत्नकीर्तिविरचिते
श्रेणिकराजा सम्यक्त्वप्राप्तिवर्णनो नाम प्रसंग ः || १८ || छ
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org