________________
प्रसंग अठरावा । २३७
पंचशतस्वानकुर्कुर । निर्दय पापि अतिथोर । यशोधरमुनि तपती उर । शांत कुर्कुर ते जाहाली ॥ ७१ ॥ तीन प्रदक्षणा देवोन | सन्मुख वसली येवोन ! अधोमुख स्तब्धनयन । ते दुरोन पाहे श्रेणिक ||७२|| म्हणे हा बावा कवटाळी | माझी स्वान सर्व खिळली | याची करिन मी रांगोळी । बाणजाळि वरसोनी ॥७३॥ दात खातसे कर्करा । क्रोध नेत्र ताम्रधूम्रा । बाणभाता घेवोनि त्वरा । धनुष्य करा चढवितसे ॥७४॥ | बाण सोडले अतितीक्ष्ण । अरा चमकति विद्युत्समान । बाणामागे सोड बाण । तत्क्षण काय वर्तले ॥७५॥ बाणामागे बाण येताती । स्वामिवरे पुष्प पडताती । I पुष्पमाळा गळा शोभति । दशदिशा जाति सुगंध || ७६ || तत्समयी राया श्रेणिका । गतिबंध झाला सप्तनरका । आयु तेहेतीस सागर पक्का । कर्मझोका पापयोगे ॥७७॥ सुतप पुण्य अतिशय । विघ्नवैरि विनाशनाय । ते पाहोनि श्रेणिकराय । करि आश्चर्य अंतरि ॥ ७८ ॥ जवळ येवोनि पाहे तया । अंतरि उद्भवलि पूर्ण दया । मेरुसमान धीरवीरा । व्यर्थ म्या पाप केले ॥७९॥ पश्चात्ताप करि मानसि । आता माझी गति कैसी । देवा म्या छळिले हे ऋषि । शरण कवनासी जावे म्या ॥८०॥ मी बुद्धिभ्रष्ट कैंसा जालो । बौद्ध गुरुच्या मता भुललो । तेने पापावर पडा झालो । वाया भुललो कुज्ञाना ॥८१॥ . आता म्या काय करावे । शरण कवनासी जावे । त्रिभुवन न दिसे ठाव | कवना पुसावे आत्महित ॥८२॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org