________________
२३८ : आराधना-कथाकोष तव हृदयी आठवे विचारु । मम प्रियेचा हाचि गुरू । ते म्हणे सुदेव सुगुरू । तरन तारू त्रिभुवनी ॥८३॥ आता यासिच जावे शरण । हेचि तारक त्रिभुवन । पंचशास्त्री पाहिली खूण । कुगुरू संपूर्ण दीसति ॥८४॥ ऐसे जानोनि अंतरि । जोडोनिया युगलकरी । अपनिंदा मुखे उच्चारी । स्वामिराया तारि शरणांगता ॥८५।। शरण शरण गुरूराया। शरणांगता तारी सखया । युग्मपानि जोडोनिया । पनम्य पाया भक्तियुक्ती ॥८६॥ मनि म्हने धन्य गुरू । याचा मजसी न कळे पारू । आता मी कैसे काय करु । कोन्हाचा आधारू धरू आता ॥८७॥ ऐसा करिता विचारू । मम रमणीचा हा गुरू । ते म्हणे हा संसारतारू । यापरता गुरू नोव्हे दुजा ॥८८॥ धन्य धन्य हे गुरूराय । छळ केला म्या पापिया । क्षमा कराऽनेक अन्याय । मनवचकाय शरण आलो ।।८९॥ स्वामिचे सन्मुख बैसोनि । म्हने तारावे आशीर्वचनी । उपदेश द्यावा मजलागुनि । कृपा करोनि गुरूराया ।।९०॥ ते यशोधर गुरूराय । अवधी जानोनिया हृदय । धर्म उपदेश अतिशय । श्रेणिकराय श्रवण करि ॥११॥ तत्त्व पदार्थ सारासार । वेपणक्रिया धर्म विचार । सुदेव सुगुरू सुशास्त्र । चित्त एकाग्र श्रवण केले ॥१२॥ पश्चाताप आनि उपसम । सम्यक्त जडल उपशम । भाव झाला उत्तमोत्तम । हृदयी प्रेम गुरूसी पाहे ॥१३॥ पुनः पुनः करि नमन । दृढ करोनि अंतःकरण । दृढ सम्यक्त्व होताचि पूर्ण । पापखंडन जाहाले वो ॥१४॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org